शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात मोकाट म्हशीचा धुमाकूळ; ८० वर्षीय वृद्धाचा मृत्यू, आठ जण गंभीर जखमी

By योगेश पांडे | Updated: March 9, 2026 23:44 IST

Nagpur News: महालातील गांधी गेट परिसरात सोमवारी सकाळी मोकाट फिरणाऱ्या एका आक्रमक म्हशीने अक्षरशः मृत्यूचा तांडव घातला. या भीषण घटनेत ८० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला, तर आठ हून अधिक नागरिक जखमी झाले.

- योगेश पांडे नागपूर -  महालातील गांधी गेट परिसरात सोमवारी सकाळी मोकाट फिरणाऱ्या एका आक्रमक म्हशीने अक्षरशः मृत्यूचा तांडव घातला. या भीषण घटनेत ८० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला, तर आठ हून अधिक नागरिक जखमी झाले. जखमींमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचादेखील समावेश आहे. अवघ्या काही क्षणांत घडलेल्या या थरारक प्रकारामुळे परिसरात संताप आणि हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

लक्ष्मण नारायणराव कुंभारे (८०, कोठी मार्ग, महाल) हे सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे घराबाहेर पडले होते. गांधी गेट परिसरातून जात असताना अचानक एक मोकाट म्हैस वेगाने त्यांच्या दिशेने धावत आली आणि क्षणात त्यांना जोरदार धडक दिली. म्हशीच्या या भयंकर धडकेमुळे कुंभारे रस्त्यावर कोसळले. धडकेची तीव्रता इतकी जबरदस्त होती की त्यांच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाली. हा हृदयद्रावक प्रसंग पाहून परिसरातील नागरिक अक्षरशः हादरले. काहीजण मदतीसाठी धावले, मात्र कुंभारे यांना म्हशीच्या तावडीतून वाचवणे शक्य झाले नाही. त्यांना इस्पितळात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

दरम्यान, या घटनेनंतरही म्हैस शांत झाली नाही. उलट ती आणखी बेभान होऊन रस्त्यावरून जाणाऱ्यांवर धावून जाऊ लागली. त्याच वेळी परिसरातून जात असलेल्या दोन दुचाकीस्वारांना देखील तिने जोरदार धडक दिली. या धडकेत दोघेही रस्त्यावर फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी तातडीने त्यांना उचलून जवळच्या रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यानंतर म्हशीने आणखी सहा लोकांवर हल्ला केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र म्हशीला नियंत्रित करण्याच्या प्रयत्नात पोलीस कर्मचारी राहुल चुडे हेदेखील जखमी झाले. त्यानंतर म्हशीने महालातील अंतर्गत भागात धुमाकूळ घातला. बराच वेळ प्रयत्न केल्यानंतर मनपाच्या कर्मचाऱ्यांनी नाग नदी पुलाजवळ त्या आक्रमक म्हशीला पकडून ताब्यात घेतले. मात्र तोपर्यंत एका निरपराध वृद्धाचा जीव गेला होता.

मनपाचे दुर्लक्ष, नागरिकांमध्ये संतापया घटनेनंतर गांधी गेट परिसरात नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. शहरात मोकाट जनावरांचा वाढता त्रास वारंवार समोर येत असतानाही प्रशासनाने ठोस कारवाई न केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. आज एका ८० वर्षीय वृद्धाचा जीव गेला, उद्या अजून किती जणांचा बळी जाणार?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

शांतीनगरची म्हैस महालात ?सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित म्हैस शांतीनगर परिसरातील एका व्यक्तीची आहे. मात्र कुठल्याही नियमांची पर्वा नसलेल्या म्हैसमालकाकडून तिला बाहेर सोडण्यात येत होते. मनपाच्या पथकांकडूनदेखील लक्ष देण्यात येत नसल्याने हा प्रकार घडला.

English
हिंदी सारांश
Web Title : Rampaging Buffalo Kills Elderly Man, Injures Eight in Nagpur

Web Summary : A loose buffalo in Nagpur killed an 80-year-old man and injured eight others, including a police officer. The incident sparked outrage over the lack of action against stray animals.
टॅग्स :nagpurनागपूर