शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

वाईफ अ‍ॅप्रिसिएशन डे; बायकोला नेमकं काय हवं असतं..?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 07:00 IST

खरं तर सात पर्वत, सात समुद्र ओलांडून मिळवून आणायला लागावी, इतकाही सुखी संसाराची वाटचाल अवघड नसते. नवऱ्यानं फक्त पुन्हा प्रियकराच्या मनात प्रवेश करायला हवा.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: सप्टेंबर महिन्यातला तिसरा रविवार हा वाईफ अ‍ॅप्रिसिएशन डे म्हणून पाश्चात्त्य राष्ट्रांत साजरा केला जातो. यामागे असलेला उद्देश हा जोडप्यांमधील जिव्हाळ्याचे बंध अधिक दृढ व्हावेत व पत्नीचे मन आनंदी रहावे. आजच्या दिवशी तिला तिच्या आवडीच्या वस्तू भेट म्हणून देणे, तिला फिरायला नेणे वा तिच्यासोबत हास्यविनोदात वेळ घालवणे या बाबी पतीकडून अपेक्षित असतात. आपल्या भारतीय संस्कृतीत असा दिवस साजरा करण्याला कदाचित विरोधाचा सूर लागू शकतो पण त्यामागचा हेतू मात्र नाकारला जाऊ शकत नाही.तिला हवेत फक्त दोन शब्द ... कौतुकाचे!ज्येष्ठ वैवाहिक समुपदेशक निलिमा किराणे यांच्या मते, मैत्रिणीला किंवा प्रेयसीला खूष कसं ठेवायचं ते मित्रांना / पुरुषांना खूप चांगलं कळतं. मैत्रिणीची मनापासून काळजी घेणारा, तिच्या कुठल्याही गोष्टीवर खूष होणारा आणि प्रेमाने कौतुक करणारा मित्र, लग्न करून नवरा झाल्यानंतर मात्र एकदम बदलतो. आई-वडील, घर, समाज यांच्या अपेक्षा तिच्यावर प्रोजेक्ट करायला लागतो. त्यातल्या काही ती पूर्ण करू शकते, काही नाही जमत. मग कधी तो नाराज, कधी ती नाराज. पण तरी प्रेम असतंच मनात. प्रत्येक क्षणाला त्यालाच मनात ठेऊन, त्याच्याचसाठी करत असते ती परक्या घरातलं सगळं. तो मात्र आपल्या कामात, गोतावळ्यात मग्न असतो.आपली प्रेमाने काळजी घेणारा आणि आपण त्याच्यासाठी स्पेशल आहोत असं क्षणोक्षणी दाखवणारा तो मित्र कुठे हरवला ते तिला कळतच नाही. वर्षानुवर्ष ती नवऱ्यामध्ये त्याला शोधत राहते. तो सापडत नाही तेव्हा नाराज होत राहते. प्रेम करतो म्हणूनच घरात कायमची आणली ना तिला? तिच्याचसाठी कष्ट करतोय, कमावतोय ना? तरी ही नाराज का?आणखी काय करायला हवं मी? हे त्याला कळतच नाही. का ते न कळताच संसारातली मजा आटत जाते.खरं तर लग्नापूर्वी तिच्यासाठी तो जे करत होता, ज्यासाठी तिचं लाड करणारं माहेर सोडून ती त्याच्याकडे आली, त्यातलंच कणभर त्यानं आत्ताही करायला हवं. ती अजूनही त्याच्यासाठी तशीच स्पेशल आहे याची, त्याच्या प्रेमाची खूण तिला अधूनमधून पटवत राहायला हवी. त्यानं तिचं अगदी थोडंसं, चार दोन शब्दांत, पण मनापासून कौतुक करायला हवं. ज्यानं तिला कळेल, त्याचं आपल्याकडे लक्ष आहे. त्याला आपली किंमत आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे, त्याला आपण आवडतोय.

खरं तर सात पर्वत, सात समुद्र ओलांडून मिळवून आणायला लागावी, इतकाही सुखी संसाराची वाटचाल अवघड नसते. नवऱ्यानं फक्त पुन्हा प्रियकराच्या मनात प्रवेश करायला हवा. लग्नापूर्वी तिला मिळवण्यासाठी तो जे वागत होता, त्यामुळे ती इतकी आनंदात होती, की तिचे लाड करणारं माहेर सोडून ती त्याच्याकडे आली होती. तिला आनंदी ठेवण्याची ती कला त्यानं पुन्हा एकदा आठवायला हवी.  ती अजूनही त्याच्यासाठी तशीच ‘स्पेशल’ आहे याची, त्याच्या प्रेमाची खूण तिला अधूनमधून पटवत राहायला हवी. त्यानं एवढंच समजून घ्यायला हवं, की ती  ‘फक्त त्याच्यासाठी’ आली होती. त्याच्यासोबत आलेलं सगळं तिनं फक्त ‘त्याचं’ आहे म्हणून स्वीकारलं आहे. आता या सगळ्या गोतावळ्यात तोच दिसेनासा झाला, तर तिचं येणंच निरर्थक होऊन जातं, याचं भान ठेवायला हवं. तिचं असणं गृहीत न धरता,  अगदी थोडंसं, चार दोन शब्दांत, पण ‘मनापासून’ तिचं कौतुक करायला ह्वं. ज्यानं तिला कळेल, त्याचं आपल्याकडे लक्ष आहे. त्याला आपली किंमत आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे, त्याला आपण आवडतोय. मग तिच्याही आयुष्यात अर्थ येईल.   

टॅग्स :Socialसामाजिकrelationshipरिलेशनशिप