शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान चाचणी करायला गेला...! आपल्याच मिसाईलपासून थोडक्यात वाचला, अणु केंद्राजवळ कोसळली
2
"आम्ही शत्रू नाही..." CM देवेंद्र फडणवीस यांनी मानले उद्धव ठाकरे-शरद पवारांचे आभार, पण का?
3
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
4
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex मध्ये २०० अंकांपेक्षा अधिक उसळी, कोणते शेअर्स चमकले?
5
सीक्रेट मैत्री! 'या' इस्लामिक राष्ट्रानं भारताशी साधली जवळीक; पाकिस्तानसह तुर्कीलाही मोठा धक्का
6
टॅरिफची धमकी देत ट्रम्प यांनी साधली इतिहासातील सर्वात मोठी डील; जगातील मोठी अर्थव्यवस्था झुकली...
7
...तरीही भारत बांगलादेशच्या मदतीला धावला! विमान अपघातातील जखमींवर उपचारासाठी डॉक्टरांचे पथक पाठविणार...
8
ज्या मराठी तरुणीला मारहाण झाली, तिची परिस्थिती गंभीर; डॉक्टर म्हणाले, पॅरालिसीस...'
9
बाजाराचा मोह सोडा! ३ कोटी ९ लाखांचा मालक तर PPF चं बनवेल; फक्त पती-पत्नीला हा फॅार्म्युला वापरावा लागेल
10
दुबईत नोकरी, १० लाखाची ऑफर...; मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी १९ वर्षांनी मोहम्मद शेखची सुटका
11
पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई हद्दीत प्रवेश नाहीच; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
12
स्वत:च्या कार घेऊन आता ट्रेनने जाता येणार गोव्याला! कसं? जाणून घ्या...
13
Deep Amavasya 2025: दीप पूजन शास्त्रोक्त विधीने कसे करावे आणि दिव्यांची कोणती आरती म्हणावी जाणून घ्या
14
"आपण भारतात राहतो, बंदूक घेऊन ठेवावी लागेल", प्रेग्नंसीवेळी घाबरलेली रिचा चड्डा; कारण काय?
15
जो पोलिसांना सापडला नाही, त्याला मनसेच्या कार्यकर्त्यांना कसा शोधला?; समोर आली थरारक घटना
16
पाच फुटांच्या मूर्तींचे कृत्रिम तलावांतच विसर्जन करा, पर्यावरण विभागाची सूचना!
17
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: १० राशींवर अपार धनलक्ष्मी कृपा, पगारवाढ लाभ, स्वामी शुभच करतील!
18
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
19
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
20
आजचे राशीभविष्य २३ जुलै २०२५ : या राशींना आजचा दिवस लाभदायी, या राशींसाठी...

पत्नी अन् मुलीने घेतली याकूबची भेट

By admin | Updated: July 24, 2015 02:44 IST

मुंबई बॉम्बस्फोट मालिकेचा सूत्रधार याकूब मेमन याची पत्नी रहिना, मुलगी जुबेदा आणि अन्य तीन नातेवाईकांनी गुरुवारी येथील मध्यवर्ती कारागृहात त्याची भेट घेतली.

अन्य तीन नातेवाईकही सोबत : एकमेकांना दिला दिलासानागपूर : मुंबई बॉम्बस्फोट मालिकेचा सूत्रधार याकूब मेमन याची पत्नी रहिना, मुलगी जुबेदा आणि अन्य तीन नातेवाईकांनी गुरुवारी येथील मध्यवर्ती कारागृहात त्याची भेट घेतली. भेटीपूर्वीचा अर्धा तास आणि नंतर भेटीचा अर्धा तास असे सुमारे एक तास ही मंडळी कारागृहाच्या आतल्या भागात होती.याकूबचा डेथ वॉरंट निघाल्याचे जाहीर झाल्यापासून कारागृहात त्याची भेट घेण्यासाठी नातेवाईक आणि वकिलांची धावपळ वाढली आहे. सोमवारी याकूबचा भाऊ उस्मान आणि वकील अ‍ॅड. अनिल गेडाम या दोघांनी तर, मंगळवारी या दोघांसह दिल्लीतील वकील अ‍ॅड. शुबेल फारूख यांनीही याकूबची भेट घेतली. मंगळवारी याकूबची क्युरेटिव्ह पिटिशन सर्वोच्च न्यायालयाने खारीज केली. याच दिवशी त्याने कारागृह प्रशासनाकडे राज्यपालांना पाठविण्यासाठी दयेचा अर्ज दिला.या सर्व घडामोडी सुरू असतानाच बुधवारी रात्री याकूबची पत्नी, मुलगी आणि अन्य तीन नातेवाईकांसह मुंबईहून दुरंतो एक्स्प्रेसने नागपूरला येण्यासाठी निघाली. गुरुवारी सकाळी ८ च्या सुमारास ही मंडळी नागपूर रेल्वेस्थानकावर पोहचली. तेथून ते एका इनोव्हा कारने कारागृह परिसरात आले. कारागृह प्रशासनाकडे भेटीच्या प्रक्रियेची पूर्तता आधीच करून ठेवण्यात आली होती. त्यामुळे याकूबची पत्नी रहिना, मुलगी जुबेदा, मेव्हणी रिजवाना अकबर कारवाला, राहिल आणि मोहम्मद सुहेल मोहम्मद याकूब या पाच जणांना लगेच व्हिजिटर रूममध्ये नेण्यात आले. सकाळी ९.३० ते १०.४५ पर्यंत त्यांनी याकूबची भेट घेतली. त्यानंतर नातेवाईकांसह याकूबची पत्नी डोळे पुसतच व्हिजिटर रुमच्या बाहेर निघाली. सज्ज असलेल्या पोलिसांच्या गराड्यात त्यांच्या ड्रायव्हरने एक पांढरी मांझा कार व्हिजिटर रूमजवळ आणली आणि त्यांना बसवून सुसाट वेगात ही मंडळी कारागृहापासून दूर निघून गेली.(प्रतिनिधी)ही भेट अखेरची ?याकूबची मुलगी जुबेदा आज त्याला कारागृहात भेटली. विशेष म्हणजे, याकूबची पत्नी रहिना कारागृहात असतानाच जुबेदा गर्भात होती. सूत्रांच्या माहितीनुसार ती आता १८ वर्षांची आहे. पित्याला भेटताना ती कमालीची सैरभैर झाली होती. याकूबही तिला पाहून अधिकच भावुक झाला होता, याकूब, जुबेदा आणि रहिना असे तिघेही बराच वेळ केवळ अश्रू ढाळत होते. त्यानंतर भेटीची वेळ संपत आल्याची त्यांना पहिल्यांदा जेव्हा सूचना करण्यात आली तेव्हा त्यांनी एकमेकांची वास्तपूस्त करून एकमेकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केल्याचे सूत्रांचे सांगणे आहे. दरम्यान, याकूबच्या नातेवाईकांनी घेतलेली त्याची ही भेट अखेरची ठरते की काय, अशी चर्चा कारागृह परिसरात काही जण करीत होते. पत्रकारांना गुंगारायाकूबच्या नातेवाईकांशी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची चर्चा होऊ नये म्हणून कारागृह आणि पोलीस प्रशासनाने कमालीची खबरदारी घेतली. यापूर्वी कारागृहात भेटीला येणाऱ्यांना डीआयजीच्या कार्यालयासमोरच्या प्रवेशद्वारातून आतमध्ये आणले जात होते. गुरुवारी मात्र याकूबची पत्नी, मुलगी आणि अन्य नातेवाईकांचे वाहन पोलिसांनी कारागृहाच्या दक्षिण भागाकडून (कार वॉश सेंटर जवळ) मैदानाकडे आत घ्यायला लावले. तेथूनच ही मंडळी व्हिजिटर रूममध्ये पोहचली अन् नंतर तेथूनच ती परतही गेली. प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उत्तरेकडे उभे होते. त्यांची यामुळे मोठी धावपळ झाली.