शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीलाही पतीच्या तोडीचे जीवन जगण्याचा अधिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 10:43 IST

महिला व पुरुषामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाऊ शकत नाही या कायदेशीर तरतुदीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात दिलेल्या निर्णयामुळे पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.

ठळक मुद्देमुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णयपोटगी कमी करण्यास नकार दिला

राकेश घानोडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महिला व पुरुषामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाऊ शकत नाही या कायदेशीर तरतुदीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात दिलेल्या निर्णयामुळे पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. या निर्णयात न्यायालयाने पत्नीलाही पतीच्या तोडीचे जीवन जगण्याचा अधिकार असल्याचे म्हटले आहे.स्वत:च्या पत्नीला पोसणे ही पतीची जबाबदारी आहे. पत्नी सोबत राहात असताना पतीने स्वत:चा सामाजिक दर्जा व जीवनशैलीनुसारच तिला पोसले पाहिजे. तसेच, पतीने पत्नीला घराबाहेर काढले असेल, तिला माहेरी किंवा विभक्त राहण्यास बाध्य केले असेल आणि तिच्याकडे आर्थिक उत्पन्नाचे काहीच साधन नसेल तर, अशावेळी तिला स्वत:च्या तोडीचे जीवन जगता येईल एवढी रक्कम पुरविणे हे पतीचे कर्तव्य आहे असे मत न्यायालयाने नोंदविले आहे.प्रकरणातील पतीने पत्नीची पोटगी कमी करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता वरीलप्रमाणे भूमिका मांडून पतीची याचिका फेटाळून लावली. तसेच, पतीवर २५ हजार रुपये दावा खर्चही बसवला. जिल्हा न्यायालयाने पत्नीला मासिक सहा हजार रुपये पोटगी मंजूर केली आहे. त्यावर पतीचा आक्षेप होता. पती सुरत येथील कंपनीत व्यवस्थापक असून त्याला ३३ हजारावर वेतन आहे.

पत्नीचा छळप्रकरणातील दाम्पत्याचे १६ फेब्रुवारी २०१० रोजी लग्न झाले आहे. पती विविध कारणांवरून पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करीत होता. पतीचे कुटुंबीय छळात सहभागी होते. त्यामुळे पत्नीला सासरी राहणे अशक्य झाले होते. त्यामुळे ती माहेरी निघून गेली. त्यानंतर तिने पोटगी व अन्य बाबींसाठी कायदेशीर मार्गाचा अवलंब केला.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय