शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

चौकशी न करता निलंबित का केले ? राज्यभरातील महसूल अधिकारी कर्मचारी शुक्रवारपासून जाणार बेमुदत संपावर

By आनंद डेकाटे | Updated: December 17, 2025 20:12 IST

विनाचौकशी निलंबनाच्या घोषणांमुळे महसूल अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष : बेमुदत कामबंद आंदोलनाची दिली नोटीस

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळ अधिवेशनात महसूल मंत्र्यांनी मोठ्या प्रमाणावर महसूल अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची घोषणा केली. यापूर्वी सुद्धा अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. कुठलीही चौकशी न करता अशा प्रकारे थेट निलंबित केले जात असल्याने महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला असून भितीचे वातावरण आहे. या कारवाईच्या विरोधात राज्यभरातील महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांनी येत्या १९ डिसेंबर पासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात बुधवारी महाराष्ट्र राज्य महसूल अधिकारी-कर्मचारी समन्वय महासंघाच्यावतीने बेमुदत कामबंद आंदोलनाची नोटीस मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री सचिवालयाच्या सहसचिव आशा पठाण यांच्याद्वारे सादर केली. 

 महासंघाच्या निवेदनात म्हटले आहे की, हिवाळी अधिवेशनादरम्यान १२ डिसेंबर रोजी सभागृहात लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना महसूल मंत्र्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता, कोणत्याही चौकशी समितीचा अहवाल नसताना विधिमंडळात ४ तहसीलदार, ४ मंडळ अधिकारी, ३ ग्राम महसूल अधिकारी यांना निलंबित करण्याची घोषणा केली. पुन्हा १३ डिसेंबर रोजी पवनी येथील उपविभागीय अधिकाऱ्यांच्या निलंबनाची घोषणा केली. यापूर्वी सुद्धा अशी कारवाई झाली आहे. जानेवारी २०२५ पासून २८ नायब तहसीलदार व तहसीलदार, ४ उपजिल्हाधिकारी, ८ मंडळ अधिकारी आणि ग्राम महसूल अधिकारी, सहायक महसूल अधिकारी एक महसूल सहायक यांना निलंबित करण्यात आले आहे.यामुळे महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष असून भितीचे वातावरण आहे.

याविरोधात पुण्यामध्ये आधीच आंदोलन सुरूआहे. संघटनेने या आंदोलनाला पाठींबा दर्शवित १९ डिसेंबर पासून बेमुदत काम बंदचा निर्णय घेतला आहे. शिष्टमंडळात संघटनेचे सुरेश बगळे यांच्या नेतृत्वात देवेंद्र शिदोळकर, माधव वाघमारे, राजेश चुटे, मंगेश जांभुळकर, सचिन शिंदे आदींचा समावेश होता.   

English
हिंदी सारांश
Web Title : Revenue officers on strike: Suspensions without inquiry spark outrage.

Web Summary : Maharashtra's revenue officers will strike indefinitely starting December 19th, protesting mass suspensions without prior investigations. The action follows the suspension of several officials, creating fear and discontent among employees. A notice has been submitted to the Chief Minister.
टॅग्स :nagpurनागपूरGovernmentसरकारRevenue Departmentमहसूल विभाग