शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात कोरोनामारक औषधांचा तुटवडा का आहे? हायकोर्टाचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 10:59 IST

राज्यामध्ये कोरोना मारक औषधांचा तुटवडा का आहे, असा परखड सवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी केंद्र व राज्य सरकारला विचारला आणि यावर एक आठवड्यात सविस्तर उत्तर सादर करण्याचा आदेश दिला.

ठळक मुद्देकेंद्र व राज्य सरकारला उत्तर सादर करण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यामध्ये कोरोना मारक औषधांचा तुटवडा का आहे, असा परखड सवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी केंद्र व राज्य सरकारला विचारला आणि यावर एक आठवड्यात सविस्तर उत्तर सादर करण्याचा आदेश दिला.यासंदर्भात जिल्हा विधिज्ञ संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. कमल सतुजा यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व नितीन सूर्यवंशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. याचिकेमध्ये सेंट्रल ड्रग्ज स्टॅन्डर्ड कंट्रोल आॅर्गनायझेशन, महानगरपालिका आयुक्त, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च, मेडिकलचे अधिष्ठाता व मेयो अधिष्ठाता यांनाही प्रतिवादी करण्यात आले आहे. पुढच्या तारखेपर्यंत त्यांनादेखील आपापली भूमिका मांडायची आहे.

राज्यामध्ये सर्वत्र कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सर्वत्र रेमडिविसीरसह अन्य कोरोना मारक औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. विदर्भातील रुग्णांना कोरोना मारक औषधांच्या तुटवड्याचा फटका सहन करावा लागत आहे. शिक्षणतज्ज्ञ सुनील मिश्रा व अ‍ॅड. शशिकांत बोरकर यांचा नुकताच कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांना वेळेवर आवश्यक कोरोना मारक औषधे मिळाली नव्हती. याशिवाय सरकारी रुग्णालयांमध्ये गुणवत्ताहीन उपचार सुरू आहेत. कोरोना रुग्णांकरिता दर्जेदार सुविधायुक्त वॉर्ड नाहीत. परिणामी, दुर्बल घटकातील रुग्णांना मिळेल तसे उपचार घ्यावे लागत आहेत. ते खासगी रुग्णालयात जाऊ शकत नाहीत. त्यांच्याकडे सरकारनेच गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. करिता, उपचाराची गुणवत्ता वाढविण्यासाठी समिती स्थापन करण्यात यावी. तसेच, कोरोना रुग्णांवर भरमसाट शुल्क आकारणाऱ्या खासगी रुग्णालयांवर केलेल्या कारवाईचा अहवाल आणि विदर्भात उपलब्ध असलेल्या कोरोना मारक औषधांच्या साठ्याची माहिती न्यायालयात सादर करण्यात यावी, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांनी कामकाज पाहिले.

मार्गदर्शक तत्त्वांची पायमल्लीकोरोना तपासणी केंद्रांमध्ये मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन केले जात नाही. लक्षणे असलेल्या रुग्णांना एकत्र उभे केले जाते. शारीरिक अंतर ठेवले जात नाही. कोरोना चाचणीमध्येही अचूकता नाही. दोनदा चाचणी केल्यानंतर वेगवेगळे अहवाल दिले जात आहेत. आतापर्यंत असे अनेक प्रकार घडले आहेत, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHigh Courtउच्च न्यायालय