शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांच्याविरुद्ध एफआयआर का नोंदविला नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:18 IST

नागपूर : नागपूर सुधार प्रन्यासद्वारे बेघर नागरिकांसाठी बांधण्यात आलेल्या गृह प्रकल्पांमध्ये खोटी माहिती देऊन सदनिका मिळविण्याच्या प्रकरणात चिमूरचे आमदार ...

नागपूर : नागपूर सुधार प्रन्यासद्वारे बेघर नागरिकांसाठी बांधण्यात आलेल्या गृह प्रकल्पांमध्ये खोटी माहिती देऊन सदनिका मिळविण्याच्या प्रकरणात चिमूरचे आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम १९९, २०० व ४२० अंतर्गत एफआयआर का नोंदविला नाही, अशी विचारणा करणारी नोटीस प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी (जेएमएफसी) न्यायालयाने बुधवारी इमामवाडा व सक्करदरा पोलीस निरीक्षकांना बजावली. तसेच, यावर दोन दिवसात उत्तर सादर करण्यास सांगितले.

या न्यायालयाने गेल्या २४ डिसेंबर रोजी ॲड. तरुण परमार यांचे सीआरपीसी कलम १५६ (३) व १५५ अंतर्गतचे दोन अर्ज मंजूर करून, इमामवाडा व सक्करदरा पोलीस निरीक्षकांना भांगडिया यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदविण्याचे आदेश दिले होते. २८ डिसेंबर रोजी दोन्ही पोलीस निरीक्षकांना या आदेशाची माहिती देण्यात आली. त्यानंतरही त्यांनी एफआयआर नोंदविले नाही. परिणामी, ॲड. परमार यांनी दोन्ही पोलीस निरीक्षकांवर अवमानना कारवाई करण्यासाठी नवीन अर्ज दाखल केला आहे. त्यात न्यायालयाने दोन्ही पोलीस निरीक्षकांना नोटीस बजावली.

कीर्तीकुमार भांगडिया यांच्या पत्नी सोनल यांनी उंटखानामधील दहीपुरा येथील नासुप्र लोकगृह निर्माण योजनेतील टू-बीएचके सदनिका (इमारत-एबी, गाळा क्र. ३०१) मिळविली आहे. त्यांच्याकडे २४ सप्टेंबर २००७ पासून त्या सदनिकेचा ताबा आहे. त्यानंतर कीर्तीकुमार भांगडिया यांनी या योजनेतील दुसरी टू-बीएचके सदनिका (इमारत-एबी, गाळा क्र. ३०३) आणि सक्करदरामधील आयुर्वेदिक ले-आऊट येथील नासुप्र गृह योजनेतील थ्री-बीएचके सदनिका (इमारत-डी, गाळा क्र. २०२) मिळविली. त्यांच्याकडे दहीपुरा येथील सदनिकेचा २५ जून २००८ पासून तर, आयुर्वेदिक ले-आऊट येथील सदनिकेचा ९ एप्रिल २००९ पासून ताबा आहे. या दोन्ही सदनिका मिळविताना त्यांनी स्वत:सह पत्नी व मुलांच्या नावाने नागपूर महानगरपालिका व नागपूर सुधार प्रन्यास हद्दीमध्ये घर, गाळे किंवा भूखंड नसल्याची खोटी माहिती लिहून दिली, असे अर्जदार परमार यांचे म्हणणे आहे. अर्जदारातर्फे ॲड. सतीश उके व ॲड. वैभव जगताप यांनी कामकाज पाहिले.