शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

का दुर्मिळ होत आहे गावरान आंबा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 20:27 IST

उन्हाळा आला की बहुतेकांना आतुरता असते ती आंब्याची. हिरव्या, पिवळ्या आणि काहीशा गुलाबी रंगातील या फळांच्या राजाने रस्ते आणि बाजारही सजले आहेत. यातही अनेकांच्या मनाला भावतो तो खास वैदर्भीय गावरान आंबा. मात्र या गावरान आंब्याची प्रतीक्षा करणाऱ्या लोकांची यावर्षी मात्र निराशा होत आहे. कारण गावरान आंबा यावेळी दिसेनासा झाला आहे. मे महिना उलटूनही या आंब्याची चव लोकांना मिळाली नाही. त्यामुळे गावरान आंबा दुर्मिळ होत आहे की काय, अशी चुकचुक आंबा प्रेमींना होत आहे.

ठळक मुद्देमे उलटूनही शहरात आवक नाही : वातावरण बदलाचा बसला फटका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उन्हाळा आला की बहुतेकांना आतुरता असते ती आंब्याची. हिरव्या, पिवळ्या आणि काहीशा गुलाबी रंगातील या फळांच्या राजाने रस्ते आणि बाजारही सजले आहेत. यातही अनेकांच्या मनाला भावतो तो खास वैदर्भीय गावरान आंबा. मात्र या गावरान आंब्याची प्रतीक्षा करणाऱ्या लोकांची यावर्षी मात्र निराशा होत आहे. कारण गावरान आंबा यावेळी दिसेनासा झाला आहे. मे महिना उलटूनही या आंब्याची चव लोकांना मिळाली नाही. त्यामुळे गावरान आंबा दुर्मिळ होत आहे की काय, अशी चुकचुक आंबा प्रेमींना होत आहे.लॉकडाऊनच्या काळातही वेगवेगळ्या प्रकारच्या आंब्याची मोठी आवक शहरात झाली आहे. बैगनफली, केशर, हापूस, लंगडा, दशेहरी अशा प्रजातींच्या आंब्यांनी रस्ते आणि बाजार सजले आहेत. मात्र यात गावरान आंबा कुठेही नाही. जाणकारांच्या मते, यावर्षी वैदर्भीय गावरान आंब्याचे उत्पादन न होण्याची अनेक कारणे आहेत. हवामानातील बदल त्यासाठी कारणीभूत आहे. वृक्ष व पक्षी अभ्यासक नितीन मराठे यांनी सांगितले, यावर्षी भर उन्हाळ्यातही पावसाने नियमित हजेरी लावली आहे. आंब्याला ऐन मोहर आलेला असताना पावसाळी वादळवाºयाने हा मोहर झडला शिवाय लहान कैºयाही झडून पडल्या. त्यामुळे आंब्याचे उत्पादन हवे तसे झाले नाही. शहरातच नाही तर गावातही लोकांना हवा तसा आंब्याचा आस्वाद घेता आला नाही. हे यावर्षी आंबा कमी होण्याचे नैमित्तिक कारण आहे. मात्र गावरान आंब्याबाबत निर्माण झालेली उदासीनता हे दूरवर परिणाम करणारे कारण दुर्लक्षित करता येणार नाही, असे मत मराठे यांनी व्यक्त केले.

आमराईच उरली नाहीनितीन मराठे यांनी गेल्या काही वर्षांतील अभ्यासाअंती नोंदविलेले निरीक्षण चिंता करण्यासारखे आहे. पूर्वी बैलजोडीच्या मदतीने शेतीची कामे व्हायची. नांगरणी, वखरणी उन्हाळ्यात व्हायची. काम करून थकल्यानंतर सावलीत जेवण करता यावे, आराम करता यावा म्हणून एक तरी आंब्याचे झाड शेतात असायचे. पण ट्रॅक्टरने शेतीची कामे सुरू झाल्यानंतर हीच विशाल झाडे अडचणींची झाली. झाडाच्या सावलीत पिके येत नाहीत म्हणून या झाडांची कटाई झाली. गावोगावी आमराईत शेकडो झाडे असायची. मात्र कृषिमालासाठी पेट्या बनवायला आंब्याच्या लाकडाचा उपयोग केला जातो. त्यामुळे मोठी वृक्षतोड करून ती विकण्यात आली. त्यामुळे आमराई शिल्लक राहिली नाही. म्हणूनच येत्या काळात गावरान आंबे दुर्मिळ होतील, अशी भीती मराठे यांनी व्यक्त केली.

आंबा लागवडीला प्रोत्साहन मिळावेशासनाने शेतावर आंब्याचे झाड असलेल्या शेतकऱ्यांना पाच वर्षातून एकदा सबसिडी द्यावी, जेणेकरून शेतकरी आंब्याचे जतन करतील. गावरान आंब्याला फळे यायला बरीच वर्षे लागतात. त्यामुळे लवकर फळे देणाऱ्या हायब्रीड प्रजातीला प्राधान्य दिले जाते. वृक्षारोपण कार्यक्रमात कॅशिया, गुलमोहर, सप्तपर्णी अशा निरुपयोगी विदेशी वृक्षांची लागवड करण्यापेक्षा आंब्याची लागवड करावी, अशी गरज मराठे यांनी व्यक्त केली.