शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

सुपीक जमिनीवर डम्पिंग यार्ड कशासाठी?

By admin | Updated: July 26, 2016 02:40 IST

कळमेश्वर तालुक्यातील बोरगाव (धूरखेडा), तोंडाखैरी, बेल्लोरी, सिल्लोरी या गावातील शेतकऱ्यांच्या सुमारे २५० एकर सुपीक जमिनीवर डम्पिंग यार्डचे आरक्षण टाकण्यात आले आहे.

शेतकरी उतरणार रस्त्यावर : आज नासुप्रसमोर ठिय्या आंदोलननागपूर : कळमेश्वर तालुक्यातील बोरगाव (धूरखेडा), तोंडाखैरी, बेल्लोरी, सिल्लोरी या गावातील शेतकऱ्यांच्या सुमारे २५० एकर सुपीक जमिनीवर डम्पिंग यार्डचे आरक्षण टाकण्यात आले आहे. शहरातील लोकांचा कचरा ग्रामीण भागात आणून टाकण्यासाठी या सुपीक जमिनीची निवड का करण्यात आली, असा आक्षेप शेतकऱ्यांनी घेतला असून या निर्णयाविरोधात एल्गार पुकारला आहे. जय जवान जय किसान संघटना तसेच डम्पिंग यार्ड विरोधी कृती समितीच्या बॅनरखाली शेतकरी रस्त्यावर उतरणार असून, आज मंगळवारी नासुप्रसमोर ठिय्या आंदोलन करणार आहे. डम्पिंग यार्डसाठी आरक्षित करण्यात आलेली बहुतांश जमीन काळी व सुपीक आहे. या जमिनीत शेतकरी कापूस, सोयाबीन, तूर, चणा, गहू, भाजीपाला अशी पिके घेतात. संत्रा व मोसंबीच्या बागाही आहेत. या जमिनीत पिकांसाठी आवश्यक घटकांचे प्रमाण भरपूर असून, भूगर्भात पाण्याचा मुबलक साठाही उपलब्ध आहे. डम्पिंग यार्डचे आरक्षण टाकल्यापासून येथील शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला होता. जय जवान जय किसान संघटनेचे मुख्य संयोजक प्रशांत पवार यांनी शेतकऱ्यांना सोबत घेत याविरोधात आवाज उठविला होता. आंदोलनेही केली. गावसभा घेतल्या. मेट्रोरिजन आराखड्याविरोधात घेतलेल्या जनमत चाचणीत या गावांतील शेतकऱ्यांनी डम्पिंग यार्ड विरोधात मतदान करून रोष व्यक्त केला होता. त्यानंतर ३ आॅक्टोबर २०१५ रोजी नासुप्रतर्फे जनसुनावणी घेण्यात आली. या समितीतही पवार यांच्यासह शेतकऱ्यांनी जाहीर विरोध केला. सर्वेक्षण करणाऱ्या एजन्सीने प्रत्यक्ष शेतावर न जाता, जमीन व पीक पाहणी न करता संबंधित आरक्षण टाकले आहे, असा आक्षेप घेण्यात आला. यावर तत्कालीन सभापती श्याम वर्धने यांनी तज्ज्ञांची एक समिती प्रत्यक्ष पाहणी करेल व आवश्यक ते फेरबदल करेल, असे जाहीरपणे सांगितले होते. मात्र, त्यानंतरही तज्ज्ञांची कुठलीही समिती प्रत्यक्ष पाहणीसाठी या गावांमध्ये आलीच नाही. असे असतानाही जून २०१६ मध्ये नासुप्रच्या विश्वस्त मंडळाने मेट्रो रिजनचा विकास आराखडा मंजूर करून राज्य सरकारकडे पाठविला. या आराखड्यात संबंधित डम्पिंग यार्डचे आरक्षण रद्द केलेले नाही. याचाच अर्थ शेतकऱ्यांनी घेतलेल्या आक्षेपांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)गावसभेत तीव्र रोष; जमिनी देणार नाहीजय जवान जय किसान संघटनेचे प्रशांत पवार व इतर पदाधिकाऱ्यांनी आरक्षणग्रस्त गावात जाऊन गावसभा घेतल्या. या सभांमध्ये शेतकऱ्यांनी नासुप्र व राज्य सरकारविरोधात तीव्र रोष व्यक्त केला. शेतीवर आमचे पोट आहे. शेती गेली तर आमचे संसार उघड्यावर येतील. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत जमिनी देणार नाही. त्यासाठी पाहिजे तो टोकाचा संघर्ष करू, अशा भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. आता हे संतप्त शेतकरी आज, मंगळवारी नासुप्रवर चालून येणार आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधींचाही विरोधमनसेचे उपाध्यक्ष प्रशांत पवार यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधींही डम्पिंग यार्डला विरोध दर्शविला आहे. आमदार सुनील केदार, कळमेश्वर पंचायत समितीचे माजी अध्यक्ष वैभव घोंगे, बाजार समितीचे संचालक संजय पाटील ठाकरे, सरपंच प्रदीप गुडधे यांनीही डम्पिंग यार्ड रद्द न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.