शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

वास घेतल्यानंतर मांजरी विचित्र चेहरा का करतात?

By निशांत वानखेडे | Updated: March 3, 2025 11:06 IST

Nagpur : मांजरीमध्ये वेगळे काय?

निशांत वानखेडेनागपूर : मांजर हा प्राणी तसा हिंसक प्रजातीचा पण माणसांसोबत त्यांचे संबंध जुळण्याला आता हजारो वर्षे होत आहेत. कदाचित श्वान आणि गायी म्हशीनंतर माणसांच्या जवळ आलेला हा प्राणी; पण श्वान किंवा इतर प्राण्यांची वागणूक बऱ्यापैकी आकलनात येणारी असली तरी मांजरींचे वागणे अद्यापही गूढ असल्यासारखे आहे. उंचावरून पडल्यानंतर ते जमिनीवर पायानेच टेकते, यावर शास्त्रज्ञांचे मंथन चालले असताना त्यांचे आणखी एक वागणे कुतूहल निर्माण करणारे आहे. शिंकताना किंवा एखादा वेगळा वास घेताना मांजरी विचित्र चेहरा का करतात, हा संशोधकांचा सध्याचा संशोधनाचा विषय, माणसांप्रमाणे दुर्गंधी आल्यावर त्या त्रासिक चेहरा किंवा नाक मुरडतात का, असे आधी समजले जायचे. मात्र, अभ्यासातून वातावरणातील रासायनिक सिग्नल ओळखण्यासाठीच त्या विचित्र चेहरा करतात, असे लक्षात आले आहे.

प्राण्यांमधील फेरोमोन्स काय असते?जंगली आणि पाळीव मांजरीसह अनेक प्राणी तोंडावाटे 'फेरोमोन्स' नामक रसायन सोडतात. हा त्यांच्या सजातीय प्रजातीच्या संवादाचा अदृश्य रासायनिक सिग्नल असतो. मांजरींमध्ये हे रसायन कसे काम करते हे शोधण्यासाठी संशोधकांनी मांजराच्या वर्तनाचा अभ्यास केला.

मांजरीमध्ये वेगळे काय?मांजरीमध्ये तोंडाच्या वरच्या भागात 'व्होमेरोनसल' या संवेदी अवयव असतो. हा अवयव नाकाच्या श्वसन तंत्रापासून वेगळा असतो. मांजरीचा फेरोमोन्सशी सामना होतो, तेव्हा त्या गंध घेण्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने हालचाल करतात. मांजरी त्यांचे तोंड हलके उघडतात, ओठ मागे वळवितात. यामुळे फेरोमोन्सचे घटक व्होमेरोनसल अवयवांपर्यंत पोहोचतात, ज्यामुळे महत्त्वाचे रासायनिक संकेत जाणण्याची मांजरीची क्षमता वाढते. या विचित्र वर्तनात भावनिक कारण नसते, तर फेरोमोन्स शोधून त्यावर प्रतिक्रिया देत असते.

फेरोमोन्सची प्रक्रिया व मांजरींची प्रतिक्रिया

  • जेव्हा मांजरी त्यांचे चेहरे फर्निचर, स्क्रैच पृष्ठभागांवर घासतात, लघवीची फवारणी करतात किंवा मलविसर्जन करतात तेव्हा ते इतर मांजरींसाठी रासायनिक संदेश सोडतात. इतर मांजरी त्यांच्या व्होमेरोनसल अवयवाचा वापर करून या सुगंधाच्या खुणांचे विश्लेषण करतात आणि त्यांच्या शेजाऱ्यांबद्दल माहिती गोळा करतात.
  • फेरोमोन रेणू चाटल्याने किंवा श्वसनाद्वारे मांजरीच्या तोंडात प्रवेश करतात आणि लाळेमध्ये विरघळतात. त्यानंतर ते तोंडाच्या वर नासोपॅलाटिन नलिकांवाटे प्रवास करीत व्होमेरोनासल अवयवापर्यंत पोहचतात. फेरोमोन रेणू व्होमेरोनासल अवयवापर्यंत पोहोचल्यानंतर मेंदूमधील हायपोथालेमसच्या एमिगडालामध्ये प्रवास करतो. हा मेंदूचा विशिष्ट भाग आहे, जेथे लैंगिक, आहारविषयक आणि सामाजिक वर्तन नियंत्रित होते.

श्वान आणि मांजरकुत्रे त्यांच्या तीव्र वासाच्या जाणिवेसाठी प्रसिद्ध आहेत, ते त्यांच्या अनुनासिक मार्गात असते. व्होमेरोनसल अवयवामुळे मांजरींमध्ये कुत्र्यांपेक्षा तिप्पट वेगवेगळ्या प्रकारचे सुगंध शोधण्याची क्षमता असते. हे अवयव त्यांच्यासाठी शक्तिशाली साधन आहे, जे वातावरणातील महत्त्वाच्या सामाजिक माहितीचे स्पष्टीकरण करण्यास सक्षम करते. मांजरी गूढ असतात त्या अशा.

फेरोमोन्स कुठे तयार होते, कशासाठी वापरतात?मांजरी इतर प्राण्यांप्रमाणे विविध संदेश पोहोचविण्यासाठी फेरोमोन्सचा वापर करतात. हनुवटी, गाल, डोळे आणि कान यांच्यातील जागा, ओठांच्या कडा, शेपटीचा भाग, गुप्तांग आणि गुदद्वाराभोवती, पंजे आणि शरीराच्या अनेक भागांत असलेल्या विशेष ग्रंथींद्वारे फेरोमोन्स स्राव होतो. ते त्यांचे क्षेत्र चिन्हांकित करण्यासाठी असू शकते. मांजर व पिलांचे संबंध मजबूत करण्यासाठी असू शकते. यासह मांजरींच्या लैंगिक स्थितीबद्दल सुचविण्यासाठीही त्याचा उपयोग होतो.

टॅग्स :nagpurनागपूर