शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

फ्रँकलिन टेम्पलटनने का बंद केले सहा म्युच्युअल फंड?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 11:14 IST

जगप्रसिद्ध म्युच्युअल फंड कंपनी फ्रँकलिन टेम्पलटनने काल भारतात सुरू असलेल्या सहा म्युच्युअल फंड योजना तडकाफडकी बंद केल्याने गुंतवणूकदार विशेषत: ज्येष्ठ नागरिक व निवृत्तिवेतनधारक हादरले आहेत.

सोपान पांढरीपांडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जगप्रसिद्ध म्युच्युअल फंड कंपनी फ्रँकलिन टेम्पलटनने काल भारतात सुरू असलेल्या सहा म्युच्युअल फंड योजना तडकाफडकी बंद केल्याने गुंतवणूकदार विशेषत: ज्येष्ठ नागरिक व निवृत्तिवेतनधारक हादरले आहेत.या सहा योजनांमध्ये गुंतवणूकदारांचे तब्बल ३१ हजार कोटी अडकले असून, ही रक्कम केव्हा मिळेल याची कुणालाच शाश्वती नाही. फ्रँकलिन टेम्पलटनने मात्र आमचे पैसे गैर-बँकिंग वित्तीय संस्था (एनबीएफसी) व सूक्ष्म वित्त पुरवठा संस्थांकडे (एमएफआय) थकीत झाले असून, त्याची वसुली होताच गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याची घोषणा केली आहे. तसेच असोसिएशन आॅफ म्युच्युअल फंड्स इन इंडियानेसुद्धा (अ‍ॅम्फी) हे तात्पुरते संकट असून फ्रँकलिन टेम्पलटन पैसे परत करेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.फ्रँकलिन टेम्पलटन ही अमेरिकेतील वित्तीय सेवा कंपनी असून, जगभर तब्बल ७०० अब्ज डॉलर (५२.५० लाख कोटी रुपये) एवढ्या प्रचंड गुंतवणुकीचे व्यवस्थापन करते. भारतात फ्रँकलिन टेम्पलटन १.१६ लाख कोटींची गुंतवणूक विविध म्युच्युअल फंडामार्फत हाताळते. जगप्रसिद्ध गुंतवणूक तज्ज्ञ मार्क मीबियस यांनी नावारूपाला आणलेल्या या कंपनीवर ही वेळ येणे लांच्छनास्पद आहे.फ्रँकलिन टेम्पलटनच्या या सहा योजनांमध्ये गुंतवणूकदारांचे ३१ हजार कोटी आहेत. त्यापैकी कंपनीने चक्क १८ हजार कोटी गैर-बँकिंग वित्तीय संस्थांमध्ये (एनबीएफसी) गुंतविले आहेत. याशिवाय ५,८०० कोटी वीजनिर्मिती कंपन्या व ४,२०० कोटी स्थावर मालमत्ता व गृहकर्ज कंपन्यांना कर्जाऊ दिले आहेत.खरे तर भारतामध्ये बहुतेक बँका एनबीएफसी व गृहकर्ज कंपन्यांना कर्ज देण्यास अनुत्सुक असतात. त्यामुळे बहुतेक म्युच्युअल फंडसुद्धा त्यात गुंतवणूक करीत नाहीत, तरीही फ्रँकलिन टेम्पलटनने हे धाडस केले. विशेष म्हणजे यासाठी कंपनीने गुंतवणूकदारांचे पैसे वापरले. आता एनबीएफसी आणि गृहकर्ज कंपन्यांनी फ्रँकलिन टेम्पलटनचे कर्ज थकविल्यामुळे गुंतवणूकदार विनाकारण अडचणीत आले आहेत.

टॅग्स :Economyअर्थव्यवस्था