शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

कशाला भांडता, असं तो विचारायला गेला आणि....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 11:18 IST

आरोपींनी वाद सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला चाकूने वार करून गंभीर जखमी केले.

ठळक मुद्देभांडण सोडविणे महागात पडलेआरोपींनी केला चाकूहल्लायशोधरानगरात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनोळखी आरोपींमध्ये सुरू असलेला वाद सोडविण्याचा प्रयत्न करणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले. आरोपींनी वाद सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला चाकूने वार करून गंभीर जखमी केले. शनिवारी रात्री ८.३० च्या सुमारास यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. अतुल पंढरीनाथ जांभूळकर (वय ४७) असे जखमी व्यक्तीचे नाव असून, ते धम्मदीप नगरातील रहिवासी आहेत.

जांभूळकर आणि त्यांच्याकडे भाड्याने राहणारे प्रशांत लक्ष्मण कोते हे दोघे शनिवारी रात्री ८ च्या सुमारास अंकिता किराणा स्टोअर समोरून जात होते. समोर असलेल्या दोनपैकी एका व्यक्तीचा मोबाईल खाली पडला आणि त्यावरून प्रशांत कोते यांची दुचाकी गेली. त्यामुळे मोबाईलचे नुकसान झाले. मोबाईलधारकासोबत वाद वाढू नये म्हणून कोते यांनी आरोपींना मोबाईल दुरुस्तीसाठी ५०० रुपये दिले. दरम्यान, ते दोन आरोपी आपसात भांडू लागले. ते पाहून अतुल जांभूळकर यांनी त्या दोघांना कशाला भांडता, असे म्हणून त्यांचा वाद सोडविण्याचा प्रयत्न केला. आतापर्यंत एकमेकांशी भांडणारे हे दोन आरोपी जांभूळकर यांच्यावर चालून आले. त्यांनी जांभूळकर यांच्या डोक्यावर, खांद्यावर चाकूचे वार करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

आजूबाजूची मंडळी धावल्यामुळे आरोपी तेथून पळाले. जखमी जांभूळकर यांना लगेच मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. प्रशांत कोते यांनी दिलेल्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी