शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

विदर्भात चारा छावण्या का नाहीत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 10:58 AM

मराठवाड्यात पडलेल्या दुष्काळामुळे जनावरांना जगविण्यासाठी सरकारने चारा छावण्या उघडल्या. विदर्भातसुद्धा अशीच अवस्था यावर्षी बघायला मिळत आहे.

ठळक मुद्देतीन तालुके दुष्काळग्रस्त पशुपालकांची चाऱ्यासाठी भटकंती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मराठवाड्यात पडलेल्या दुष्काळामुळे जनावरांना जगविण्यासाठी सरकारने चारा छावण्या उघडल्या. विदर्भातसुद्धा अशीच अवस्था यावर्षी बघायला मिळत आहे. नागपूर जिल्ह्यात तीन तालुके दुष्काळाच्या यादीत आहेत. तालुक्यात जनावरांना चारा उपलब्ध झालेला नाही. पशुपालक चाऱ्यासाठी भटकंती करीत आहेत. चारा नसल्याने जनावरांना तणस खायला घालत आहेत. काटोल, कळमेश्वर, नरखेड तालुक्यांमध्ये चाऱ्याची भीषण टंचाई आहे. पण पशुसंवर्धन विभाग चाराटंचाई नसल्याचा दावा करीत आहे. पशुपालकांची जनावरं जगविण्यासाठी होत असलेली होरपळ लक्षात घेता जिल्ह्यात चारा छावण्या का नाहीत, असा सवाल पशुपालकांनी केला आहे.काटोल, कळमेश्वर, नरखेड या तालुक्यात भीषण पाणीटंचाई आहे. जमिनीतील पाण्याची पातळी हजार फुटावर गेली आहे. यंदा पशुपालकांकडे चाºयाचे उत्पादन घेणे शक्य झाले नाही. तालुक्यात जनावरांसाठी चाराच उपलब्ध नाही. त्यामुळे जनावरांना तणस खाऊ घालावे लागत आहे. काटोल तालुक्यातील काही पशुपालकांशी चर्चा केली असता पहिल्यांदा अशी भीषण अवस्था निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे यावर्षी चारा छावण्यांची गरज असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.येनवा येथील पशुपालक नितीन आगरकर म्हणाले की, विहिरींना पाणी नसल्यामुळे एका एकरात तयार केलेला चाºयाचा प्लॉट खराब झाला आहे. त्यामुळे जबलपूर येथून चण्याचे कुटार आणावे लागत आहे. आज दुधाला मिळणारे दर आणि चाऱ्याचा वाढता खर्च परवडणारा राहिलेला नाही. पण दुष्काळात जनावरं जगवायची आहेत. त्यासाठी खटपट सुरू आहे. कोंढाळी येथील पशुपालक पुरुषोत्तम हगवते म्हणाले की, यंदा दुष्काळामुळे गहू पेरला नाही. त्यामुळे गव्हांडा राहिलेला नाही. चारा नसल्याने भंडारा जिल्ह्यातून तणस बोलाविले आहे. पहिल्यांदा ९ हजार रुपये ट्रॉली तणस घेतले, आता १०,५०० रुपये ट्रॉलीने तणस घ्यावे लागत आहे. जनावरांचे पोट भरण्यासाठी तणस खाऊ घालण्याची वेळ आली आहे. डोरली येथील पशुपालक विलास जीवतोडे म्हणाले की, काटोल तालुक्यातील चारखांब, सोनखांब, ढवळापूर, मेंढेपठार अशा बहुतांश गावांमध्ये प्रचंड चाराटंचाई आहे. यावर्षीसारखी टंचाई पहिल्यांदा अनुभवत आहे. ऐपत असलेल्या पशुपालकांनी तणस आणून सोय केली आहे. पण काही पशुपालकांनी जनावरं विक्रीस काढलेली आहेत.पशुसंवर्धन विभागाने दिलेले वैरण निकामी ठरले आहे.पशुसंवर्धन विभागाने वैरणीच्या योजना राबविल्या. पण शेतकऱ्यांपर्यंत उशिरा पोहचल्या. त्यात पाणी नसल्यामुळे वैरण उगवलेच नाही. चाऱ्याची भीषण टंचाई असताना पशुसंवर्धन विभाग कागदावर टंचाईच नसल्याचे दाखवित आहे. पशुसंवर्धन उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, पं.स. स्तरावर पशुधन अधिकारी असतानाही दुष्काळाचे नियोजन झाले नाही. त्यामुळे प्रत्येक तालुक्यात १०० ट्रक तणस जनावरांचे खाद्य म्हणून येत आहे.

टॅग्स :agricultureशेती