शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
4
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
5
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
6
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
7
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
8
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
9
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
10
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
11
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
12
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
13
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
15
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
16
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
17
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
18
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना ऑनलाईनचे वावडे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:21 IST

नागपूर : शालेय शिक्षण विभागाने ऑनलाईन कामकाजाला इतर विभागाच्या तुलनेत सर्वाधिक महत्त्व दिले आहे. मंत्रालयस्तरावरून आलेले एखादे परिपत्रक ...

नागपूर : शालेय शिक्षण विभागाने ऑनलाईन कामकाजाला इतर विभागाच्या तुलनेत सर्वाधिक महत्त्व दिले आहे. मंत्रालयस्तरावरून आलेले एखादे परिपत्रक असो की सूचना शिक्षकांपर्यंत पोहचविण्यासाठी अधिकारी ई-मेल आणि व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करीत आहे. पण शाळा अथवा शिक्षकांनी त्याचा ऑनलाईन आढावा दिल्यास अधिकाऱ्यांना ते मान्य नाही. अनेक प्रकरणांमध्ये अधिकारी ऑनलाईनला नकार देऊन शिक्षकांना, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना, मुख्याध्यापकांना कागदपत्रासह कार्यालयातच बोलावून प्रकरणाचा न्यायनिवाडा करीत असल्याचे निदर्शनास येते.

सामान्य प्रशासन विभागाने शासकीय कामकाजासाठी ई-मेल व व्हॉट्सअ‍ॅपचा वापर ग्राह्य धरण्यासंदर्भात शासन परिपत्रक काढले आहे. परंतु शिक्षणाधिकारी, जिल्हा वेतन पथक, भविष्य निर्वाह निधी खाते, विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ व शिक्षण आयुक्त कार्यालयात या परिपत्रकाची अंमलबजावणी काटेकोरपणे केली जात नाही. या विभागाचे अधिकारी शासनस्तरावरून झालेला निर्णय ई-मेल अथवा व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून शाळा आणि शिक्षकांपर्यंत पोहचवितात. पण शाळा अथवा शिक्षकांकडून पाठविण्यात आलेले ऑनलाईन प्रस्ताव ते मान्य करीत नाही. त्यामुळे शासन मान्यता, आरटीई मान्यता, बोर्डाची मान्यता वर्धित करण्याचे, पदोन्नती बदली नियुक्त्यांचे प्रस्ताव, शालार्थ आयडीचे प्रस्ताव, थकीत व नियमित वेतन देयके, सेवानिवृत्ती वेतन प्रकरणे, वेतन निश्चितीची प्रकरणे, शिक्षक कर्मचाऱ्यांच्या अन्यायाबाबतच्या तक्रारी व अपील अधिकारी ऑनलाईन ग्राह्य धरीत नाही. परिणमी मोठ्या प्रमाणात प्रकरणे प्रलंबित राहतात. अधिकारी प्रकरणाशी संबंधित असलेल्यांना कागदपत्रासह वैयक्तिक बोलावून प्रकरणाचे न्यायनिवाडे करतात. त्यामुळे दुर्व्यवहार व भ्रष्टाचाराला वाव मिळतो. असले प्रकार शिक्षण विभागात सर्रास सुरू आहेत.

त्यामुळे या प्रकरणाला पायबंद घालायचा असेल, कार्यालयातील प्रलंबित प्रकरणाची समस्या संपुष्टात आणायची असेल तर शासन परिपत्रकाची काटेकोर अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. ऑनलाईन कामकाजासंदर्भातील शासन परिपत्रकाचे काटेकोर पालन करावे, अशी मागणी शिक्षक आमदार नागो गाणार यांनी शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालकांना केली आहे.