शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

शौचालयातील भ्रूणहत्येचे पाप कुणाचे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:08 IST

अभय लांजेवार उमरेड : ‘आईच्या गर्भात राहूनी, आम्ही सारे गातो गाणी, चुलबुल-चुलबुल करीतो पोटी, पिलु बिलगते छातीशी’ या कवितेच्या ...

अभय लांजेवार

उमरेड : ‘आईच्या गर्भात राहूनी, आम्ही सारे गातो गाणी, चुलबुल-चुलबुल करीतो पोटी, पिलु बिलगते छातीशी’ या कवितेच्या ओळी गर्भसंस्काराचे बोल बोलतात. गरोदरपणाच्या नाजूक टप्प्यात मातेचा अलगद, हळुवार स्पर्श आणि गर्भसंस्कार खरोखरच लाखमोलाचे मानले जातात. असे असले तरी जन्मास येण्यापूर्वीच असंख्य नाजूक कळ्यांना कुस्करण्याच्या घटना अंधारातच गडप होतात. अशाच एका भ्रूणाला जन्मास येण्यापूर्वी आणि जगाशी नाळ जुळण्यापूर्वीच अक्षरश: गटारात फेकल्या गेले. उमरेड ग्रामीण रुग्णालयातील शौचालयात मृतावस्थेत आढळून आलेले हे पाप कुणाचे ? असा सवाल यानिमित्ताने विचारला जात आहे. मंगळवारी ‘लोकमत’ने ‘धक्कादायक ! ग्रामीण रुग्णालयाच्या शौचालयात आढळले मृत भ्रूण’ या शीर्षकाखाली वृत्त प्रकाशित केले. या संपूर्ण प्रकरणाची गंभीरतेने चौकशी व्हावी, असा सूर सर्व स्तरातून उमटतो आहे.

सोमवारी (दि.८) सकाळी १० वाजताच्या सुमारास स्वच्छता कामगार शुभम सोनेकर यास शौचालयाच्या सीटमध्ये सदर भ्रूण मृतावस्थेत आढळल्यानंतर ग्रामीण रुग्णालय प्रशासनाची झोप उडाली. प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले. याबाबत प्रस्तूत प्रतिनिधीने ग्रामीण रुग्णालय गाठत खरी परिस्थिती समजून घेतली. सदर रुग्णालयात वॉर्ड क्रमांक १३ आहे. हा वॉर्ड केवळ महिलांसाठीच आहे. वॉर्डात प्रवेश केल्यानंतर अगदी समोरच सरतेशेवटी शौचालय आहे. म्हणजेच शौचालयाकडे जायचे असल्यास संपूर्ण वॉडार्तूनच जावे लागते. येत्या दोन दिवसांत याठिकाणी बाळंतपण आणि समस्या असलेल्या महिला या वॉर्डात भरती होत्या. अशावेळी कोण, कधी हा प्रकार केला अथवा झाला याबाबत कुणासही थांगपत्ता लागू नये, यावर आश्चर्य व्यक्त होत आहे. दररोज शेकडो रुग्ण याठिकाणी उपचारासाठी येतात. अशावेळी ग्रामीण रुग्णालयाच्या सुरक्षितेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डी. व्ही. पातूरकर यांच्याशी संपर्क साधला असता मिटिंगला असल्याचे सांगत त्यांनी अधिक बोलण्याचे टाळले. दुसरीकडे उमरेड पोलीस ठाण्यात ३१८ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे यांच्या तपासाकडेही अनेकांच्या नजरा खिळल्या आहेत.

सीसीटीव्हीकडे नजरा

उमरेड ग्रामीण रुग्णालयात सीसीटीव्ही आहेत. या कॅमेऱ्यांच्या नजरेत जर येत्या काही दिवसांतील हालचाली स्पष्ट दिसून आल्या तर संपूर्ण घटनेचा उलगडा झाल्याशिवाय राहणार नाही. याबाबत येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. एम. निंबार्ते यांच्याशी चर्चा केली असता, सध्या रेकॉर्ड रूमला कुलूप लागले आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. एन. खानम नागपूरला महत्त्वाच्या कामात आहेत. त्या आल्यानंतरच या बाबी स्पष्ट होतील, असे सांगितले. बाहेरून कुणीतरी भ्रूण आणून शौचालयात फेकले असावे, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. गावपरिसरात सोयीस्करपणे विल्हेवाट लावण्यासाठी जागा असताना रुग्णालयाची जोखीम पत्करणार तरी कोण? असा सवालही यावेळी प्रतिनिधीने उपस्थित केला. या संपूर्ण प्रकरणात फारसे कुणी बोलत नसले तरी सीसीटीव्हीच बोलणार आणि पोल खोलणार अशी बाब व्यक्त होत आहे.