शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

घटनास्थळावरील रुमाल कुणाचा?

By admin | Updated: May 15, 2017 02:29 IST

पोलिसांनी एका हत्या प्रकरणामध्ये घटनास्थळावर सापडलेला रक्ताने माखलेला रुमाल कुणाचा होता

पोलिसांकडून तपास नाही : आरोपींना संशयाचा लाभ लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पोलिसांनी एका हत्या प्रकरणामध्ये घटनास्थळावर सापडलेला रक्ताने माखलेला रुमाल कुणाचा होता व तो रुमाल मयताच्या डोक्याला कोणी बांधला होता, याचा तपासच केला नाही. यासह अन्य मुद्यांमुळे सरकारी पक्षाची बाजू अविश्वसनीय ठरली. परिणामी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आरोपींना संशयाचा लाभ दिला. ही घटना बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. मृताचे नाव सचिन जालंधर इंगळे होते. ८ मे २०११ रोजी त्याचे लग्न होणार होते. असे असताना तो प्रत्यक्षदर्शी साक्षीदार संतोष इंगळेसोबत जळाऊ लाकडे गोळा करण्यासाठी शेतात गेला होता. त्या ठिकाणी आरोपींनी त्याला कुऱ्हाड, कुदळ व काठ्यांनी मारले. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला, असे सरकारी पक्षाचे म्हणणे होते. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा १० मे रोजी केला. संतोष घटनास्थळावर असताना त्याने सचिनला वाचविण्याचा प्रयत्न केला नाही. तो पळून गेला. त्याने घरी जाऊन सचिनची आई छबूबाईला घटनेची माहिती दिली. त्यानंतर छबूबाई घटनास्थळावर न जाता थेट पोलीस ठाण्यात गेली. हे मुद्दे संशय निर्माण करणारे ठरले. सत्र न्यायालयाने चार आरोपींना निर्दोष सोडले होते तर, दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. चार आरोपी निर्दोष सुटल्यामुळे शासन व तक्रारकर्तीने तर, शिक्षा झालेल्या आरोपींनी त्यांच्या शिक्षेविरुद्ध उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने वरील बाबी लक्षात घेता, शिक्षा झालेल्या आरोपींना निर्दोष सोडण्याचा आदेश दिला तर, अन्य आरोपींचे निर्दोषत्व कायम ठेवून शासन व तक्रारकर्तीचे अपील खारीज केले. आरोपींतर्फे अ‍ॅड. राजेंद्र डागा व अ‍ॅड. एस. झोटिंग यांनी बाजू मांडली.