शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

ग्रा.पं.चा कौल कुणाला? नागपूर जिल्ह्यात ८०.२७ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 00:35 IST

नागपूर जिल्ह्यातील ३७४ ग्रामपंचायतींमध्ये बुधवारी सरपंच आणि सदस्यपदासाठी शांततेत मतदान पार पडले. जिल्ह्यात सरासरी ८०. २७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे३७४ ग्रा.पं.मध्ये मतदान शांततेत७३०३ उमेदवारांचे भाग्य मशीनबंदआज ठरणार गावकारभारी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर जिल्ह्यातील ३७४ ग्रामपंचायतींमध्ये बुधवारी सरपंच आणि सदस्यपदासाठी शांततेत मतदान पार पडले. जिल्ह्यात सरासरी ८०. २७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.राज्य निवडणूक आयोगाने नागपूर जिल्ह्यातील ३८१ ग्रामपंचायत आणि रामटेक तालुक्यातील भिलेवाडा येथील सरपंचपदाचा निवडणूक कार्यक्रम २३ आॅगस्ट रोजी जाहीर केला होता. निवडणुकीचे सर्व टप्पे पार पडल्यानंतर जिल्ह्यात सहा ग्रा.पं.मध्ये सरपंच आणि सदस्यपदाची निवडणूक बिनविरोध पार पडली. यासोबत दोन ग्रा.पं.मध्ये सरपंचपदाचे उमेदवार बिनविरोध नामित करण्यात आले. त्यामुळे बुधवारी ३७४ ग्रा.पं.मध्ये सरपंच आणि सदस्य पदासाठी मतदान घेण्यात आले.जिल्ह्यातील ३७४ सरपंचपदासाठी १३०९ उमेदवारांचे भाग्य बुधवारी मशीनबंद झाले. यासोबतच विविध ग्रा.पं.मध्ये सदस्य पदासाठी नशीब आजमाविणाऱ्या ५९९४ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला उद्या, गुरुवारी मतमोजणीनंतर स्पष्ट होईल.राजकीयदृष्ट्या विचार केल्यास नागपूर जिल्ह्यावर भाजपचे प्रभुत्व आहे. मात्र अजूनही ग्रा.पं.पातळीवर काँग्रेसची पांरपरिक पकड आहे. त्यामुळे बहुतांश ग्रा.पं.मध्ये भाजप आणि काँग्रेसप्रणीत पॅनेलमध्ये काट्याची टक्कर झाल्याचे चित्र दिसून आले. यासोबत जिल्ह्यातील काही तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनाप्रणीत पॅनेलचे उमेदवार बाजी मारण्याची शक्यता आहे.आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका लक्षात घेत अधिकाधिक ग्रा.पं.मध्ये सत्ता मिळविण्यासाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी यावेळी कंबर कसली होती, हे विशेष.ईव्हीएम जोरातसार्वत्रिक निवडणुका आणि ईव्हीएमध्ये बिघाड असे समीकरण मागील वर्षभरात झालेल्या निवडणुकात पहावयास मिळाले होते. मात्र बुधवारी नागपूर जिल्ह्यात झालेल्या ३७४ ग्रा.पं.पैकी बहुतांश ठिकाणी ईव्हीएम मध्ये कोणताही तांत्रिक बिघाड दिसून आला नाही. कळमेश्वर तालुक्यातील काही गावात याबाबत प्राथमिक तक्रारी दिसून आल्या. मात्र लगेच तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आले.तालुकानिहाय मतदानाची टक्केवारीकळमेश्वर ८१.४४मौदा ८८.७५नरखेड ८०.६३भिवापूर ८०.३०सावनेर ७७.९६कुही ८२उमरेड ७५काटोल ८५रामटेक ८०नागपूर ग्रामीण ७३पारशिवनी ७९.५२कामठी ८४.९२हिंगणा ७५

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक