शहरं
Join us  
Trending Stories
1
“माओवाद १०० टक्के संपणार, भूपतीची शरणागती मोठी गोष्ट”; CM फडणवीसांनी केले पोलिसांचे अभिनंदन
2
तालिबानकडे मिसाईल कुठून आली? हल्ला होताच गाफिल पाकिस्तान हादरला; ६५ वर्षांपूर्वी...
3
बाबासाहेब पाटलांनी पालकमंत्रिपद सोडलं, त्यांच्या जागी 'या' नेत्याला मिळाली जबाबदारी
4
दिवाळीपूर्वी 'या' दिग्गज कंपनीचा मोठा झटका! १५ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार? काय आहे कारण?
5
मोठी रिअल इस्टेट डील; अदानी खरेदी करणार सहाराच्या 88 मालमत्ता; किती कोटींचा व्यवहार?
6
प्रेरणादायी! वडील तिसरी, आई सातवी पास; अकरावी नापास प्रियल कशी झाली डेप्युटी कलेक्टर?
7
'जंगलात जरी बोलवलं तरी गेलो असतो'; पोलिसांना दिलेले वचन CM फडणवीसांनी पूर्ण केले, कार्यक्रम रद्द करुन पोहोचले गडचिरोलीत
8
“...तोपर्यंत निवडणुका घेऊच नका, मतदारयादीची लपवाछपवी का?”; राज ठाकरेंची आयोगाला विचारणा
9
आधी बंपर लॉटरी लावली... आता एलजीच्या एमडींनी हिंदीत भाषण केलं; मन जिंकताच दिग्गज उद्योजकानंही केलं कौतुक
10
प्रशांत किशोर यांचा मोठा निर्णय; बिहार विधानसभा निवडणुकीतून घेतली माघार, कारण काय..?
11
अ‍ॅश्ले टेलिस यांना ट्रम्प भारतात राजदूत बनवणार होते, अचानक हेरगिरी प्रकरणी अटक; चीनशी कनेक्शनचा आरोप
12
१५ मिनिटांत पाकने गुडघे टेकले, अफगाणिस्तानसमोर सपशेल शरणागती, शस्त्रे सोडून सैनिक पळाले!
13
एकनाथ शिंदेंचा काँग्रेससह शरद पवार गटाला मोठा धक्का, बडे नेते शिवसेनेत; पक्षाची ताकद वाढली
14
सोने नव्हे, चांदीची किंमत 'रॉकेट' वेगाने का वाढतेय? पांढरा धातू २,६९,००० प्रति किलोवर पोहोचणार?
15
फायद्याची गोष्ट! हात धुण्याची योग्य पद्धत माहितीय का? ९९% लोक करतात 'या' छोट्या चुका
16
क्रेडिट कार्ड बंद केल्यानं तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होतो का? बंद करण्यापूर्वी जाणून घ्या काही महत्त्वाची गोष्टी
17
बसला भीषण आग, धुरामुळे दरवाजा लॉक; काचा फोडून मारल्या उड्या, थरकाप उडवणारी घटना
18
'कौआ बिर्याणी'च्या डायलॉगमुळे प्रसिद्ध झालेला हा अभिनेता आठवतोय का?, एकेकाळी विकायचा साडी
19
शेतकऱ्यांसाठी दिवाळी भेट! पीएम किसान योजनेचा २१वा हप्ता कधी येणार? तुमचे नाव यादीत असे घरबसल्या तपासा
20
Gold Price Impacts on buying: किंमती वाढल्या तरी सोनं खरेदी करणं थांबवत नाहीत भारतीय; पण यावेळी झालाय परिणाम, जाणून घ्या

काम कुणाचे, श्रेय कुणाला?

By admin | Updated: September 7, 2016 02:55 IST

निवडणुका जवळ आल्यामुळे अध्यक्षासह पदाधिकाऱ्यांना प्रसिद्धीची ओढ लागली आहे. एकाच कामाच्या दोन वेगवेगळ्या विभागाकडून प्रेसनोट काढण्यात येत आहे.

पदाधिकाऱ्यांना लागली प्रसिद्धीची ओढ : एकाच कामाच्या दोन प्रेसनोटनागपूर : निवडणुका जवळ आल्यामुळे अध्यक्षासह पदाधिकाऱ्यांना प्रसिद्धीची ओढ लागली आहे. एकाच कामाच्या दोन वेगवेगळ्या विभागाकडून प्रेसनोट काढण्यात येत आहे. त्यामुळे काम कुणाचे आणि श्रेय कुणाला द्यावे या पेचात ग्रामीण जनता पडलेली आहे. परंतु श्रेय लाटण्याच्या या प्रकारामुळे पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव दिसून आला आहे. जिल्हा नियोजन समिती (डीपीसी) ने जिल्हा परिषदेने दिलेल्या एका प्रस्तावाला निधीची मंजुरी दिली आहे. परंतु हे काम पालकमंत्र्यांच्या माध्यमातून आपणच मंजूर करून आणले आहे, असा काहीसा आव जि.प. अध्यक्ष आणत आहे. पालकमंत्र्यांशी वारंवार भेटून त्यांना हा प्रस्ताव मंजूर करण्याची विनंती केल्यामुळे जिल्ह्यात रस्त्यासाठी १६.५० कोटी तर ‘क ’ तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी ७.४५ कोटी मिळाल्याचे त्यांनी पाठविलेल्या प्रसिद्धी पत्रकातून स्पष्ट होत आहे. परंतु मुळात हे काम जि.प.च्या उपाध्यक्षांकडे असलेल्या बांधकाम विभागाचे आहे. या कामाला निधीची मंजुरी मिळताच उपाध्यक्षांनी ताबडतोब प्रेसनोट काढून पंचायत समितीनिहाय कामांचे वाटप झाल्याची माहिती आकडेवारीसह २२ आॅगस्टलाच घोषित करून दिली. त्यांनी सुद्धा आपल्या प्रेसनोटमध्ये पालकमंत्र्यांचे कामाला मंजुरी दिल्याबद्दल आभार मानले. मात्र अध्यक्षांना त्यातून डावलले. याच विषयाची प्रेसनोट ३ सप्टेंबरला जि.प. अध्यक्षांनी प्रसिद्ध केली. त्यांनी सुद्धा प्रेसनोटमध्ये पंचायत समितीनुसार ‘क ’ वर्ग तीर्थक्षेत्र व रस्त्याला मिळालेल्या मंजुरीची आकडेवारी व निधी प्रसिद्ध केली. पालकमंत्र्यांनी मंजुरी दिल्याबद्दल आभार मानले. फक्त बांधकाम विभागातून रस्त्यासंदर्भात प्रस्ताव गेल्याचा उल्लेख केला. परंतु बांधकाम समितीच्या सभापतींना स्थान दिले नाही. मुळात मंजूर झालेल्या कामाचे नियोजन, सदस्यांकडून कामाची मागणी, जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांकडे त्यासाठी करावा लागणारा पाठपुरावा बांधकाम सभापतींकडूनच झाला आहे. असे असले तरी, काम जिल्हा परिषदेचे आहे. बांधकाम सभापतींनी कामाचे श्रेय लाटताना अध्यक्ष म्हणून त्यांचा उल्लेख करणे गरजेचे होते. अध्यक्षांनीही प्रेसनोट काढताना बांधकाम सभापतींचा उल्लेख करणे गरजेचे होते. अथवा संयुक्त प्रेसनोट काढणे अपेक्षित होते. परंतु असे न करता अध्यक्ष, उपाध्यक्षांनी स्वतंत्र प्रसिद्ध पत्रक काढून दोघांमध्ये समन्वय नसल्याचे पुन्हा एकदा निदर्शनास आणून दिले आहे. (प्रतिनिधी)