शहरं
Join us  
Trending Stories
1
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
2
Video - किरण सामंत यांचे स्वतंत्र वाटचालीचे संकेत?; उदय सामंत यांचे बॅनर, फोटो हटवले
3
शरद पवार यांच्या सुनबाई यावेळी दिल्लीला जाणार हे नक्की; चित्रा वाघ यांना विश्वास
4
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
5
पाकिस्तानला करायचीय भारताची बोरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
6
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
7
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
8
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
9
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
10
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
11
चुकीला माफी नाही! आता WhatsApp ही देणार शिक्षा; 24 तासांसाठी बॅन होणार अकाऊंट
12
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
13
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
14
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
15
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
"आम्हाला मत न दिल्यास वीज कापू"; काँग्रेस आमदाराची जनतेला धमकी, Video व्हायरल
18
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
19
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
20
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार

कोण मारणार नागपूर विद्यापीठात बाजी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 11:09 PM

तब्बल सात वर्षानंतर शनिवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात सिनेट आणि विद्वत् परिषदेसाठी शनिवारी मतदान होत आहे. सिनेटच्या २९, विद्वत् परिषदेच्या ८ आणि ५२ अभ्यास मंडळाच्या प्रत्येकी तीन जागांसाठी पाच जिल्ह्यातील ८६ मतदान केंद्रावर सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होईल.

ठळक मुद्देसिनेट-विद्वत् परिषदेसाठी आज मतदानसेक्युलर एकाकी, यंग टीचर्स आक्रमकनुटा तटस्थ, शिक्षण मंचात फिल गुड

आॅनलाईन लोकमतनागपूर : तब्बल सात वर्षानंतर शनिवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात सिनेट आणि विद्वत् परिषदेसाठी शनिवारी मतदान होत आहे. सिनेटच्या २९, विद्वत् परिषदेच्या ८ आणि ५२ अभ्यास मंडळाच्या प्रत्येकी तीन जागांसाठी पाच जिल्ह्यातील ८६ मतदान केंद्रावर सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होईल.तिन्ही प्राधिकरणासाठी एकूण २७२ उमेदवार मैदानात उतरले आहेत. यंदाची विद्यापीठाची निवडणूक प्रत्येक गट स्वबळावर लढतो आहे. यात गतवेळी यंग टीचर्स आणि शिक्षण मंचाला टक्कर देणारा सेक्युलर पॅनेल यावेळी कोंडीत सापडला आहे. कारण या पॅनेलचे सर्वेसर्वा डॉ.वेदप्रकाश मिश्रा यांची गांधी विचारधारेतील पदवी निवडणुकीच्या तोंडावर चर्चेत आली आहे तर याच गटाचे डॉ. डी.के.अग्रवाल यांचा कॅसचा पदोन्नती घोटाळा पॅनेलसाठी डोकेदुखी ठरतो आहे.निवडणुकीच्या आधीच काही दिग्गजांनी रामराम केल्याने सेक्युलर पॅनेल एकाकी पडला असला तरी राजकीय मोर्चेबांधणीत हातखंडा असल्याच्या अनुभवावर सेक्युलर मैदानात अजूनही कायम आहे. गतवेळी शिक्षण मंचच्या मांडीला मांडी लावणारे डॉ.बबनराव तायवाडे यांच्या यंग टीचर्स असोसिएशनला शिक्षण मंचचे यंदा कडवे आवाहन आहे. यंग टीचर्स यावेळीही गतवेळी प्रमाणे काही मतदार संघात जोर मारण्याच्या तयारीत आहे.शिक्षण मंचाची विकास गाडी सध्या माजी प्र-कुलगुरु डॉ.गौरीशंकर पाराशर यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याने शिक्षण मंचामध्ये सध्या फिलगुड आहे. सिनेट आणि विद्वत् परिषदेचे मैदान मारण्यासाठी त्यांनी चार महिन्यांपासून सेक्युलर पॅनेलला खिंडार लावले आहे. गोंदिया आणि वर्धा जिल्ह्यात त्यांनी मोठे आॅपरेशन केले आहे. त्यामुळे शिक्षण मंच यावेळी विद्यापीठ निवडणुकीत काही मतदार संघात सेक्युलर आणि यंग टीचर्सला घाम फोडेल, असा राजकीय अंदाज लावला जात आहे. इकडे एकेकाळी विद्यापीठाच्या राजकारणात पॉवरफुल असेल्या ‘नुटा’ने यावेळी कंबर कसली आहे. मात्र कुरघोडीच्या राजकारणात नुटाच्या वाट्याला किती जागा येतात, हे २७ रोजीच निकालानंतर स्पष्ट होईल. 

 

टॅग्स :Electionनिवडणूक