शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

भिवापुरात आवाज कुणाचा? पारवे विरुद्ध पारवे रंगणार सामना

By जितेंद्र ढवळे | Updated: October 6, 2023 16:19 IST

३६ ग्रा. पं.साठी राजकीय मोर्चेबांधणी

नागपूर :नागपूर जिल्ह्यातील ३६५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. यात जिल्ह्यात शेवटच्या टोकावरील भिवापूर तालुक्यातील ५६ पैकी ३६ ग्रा. पं.च्या निवडणुका होत आहेत. यावेळी भिवापुरात कोण मैदान मारणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. निवडणुका ग्रा. पं.च्या होत असल्या तरी आगामी नगरपंचायत, नगर परिषद आणि लोकसभा निवडणुका विचारात घेता सर्वच राजकीय पक्षांचे नेते आपले सर्वाधिक सरपंच निवडून यावे यासाठी ताकद लावणार आहेत.

उमरेड विधानसभा क्षेत्रात मोडणाऱ्या भिवापूर तालुक्यात याही वेळी बहुतांश ग्रा. पं.मध्ये भाजपविरुद्ध कॉंग्रेस असाच सामना होईल. या दृष्टीने दोन्ही पक्षांकडून सरपंच पदाच्या उमेदवारांची गुरुवारपासून चाचपणी सुरू झाली आहे.२०१९च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या ताब्यातील उमरेड मतदारसंघ हिसकावून घेत कॉंग्रेसचे राजू पारवे यांनी बाजी मारली होती. मात्र विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर गत साडे तीन वर्षांत भाजपचे सुधीर पारवे यांनी पक्ष संघटन अधिक बळकट करण्यावर भर दिला आहे. मात्र या मतदारसंघातील भिवापूर आणि कुही बाजार समित्यांच्या निवडणुकीत कॉंग्रेसने दमदार यश मिळवित सत्ता स्थापन केली.

उमरेड बाजार समितीच्या निवडणुकीतही कॉंग्रेस-भाजपमध्ये काट्याची टक्कर झाली. यात भाजपचे १२, तर कॉंग्रेसचे सहा संचालक विजयी झाले. सध्या ही बाजार समिती भाजपच्या ताब्यात आहे. भिवापूर राजू पारवे आणि सुधीर पारवे यांचे होम टाऊन असल्याने तालुक्यातील ग्रा. पं. निवडणुकीत आपल्या पक्षाला यश मिळवून देण्यासाठी दोघेही मैदानात उतरले आहेत. यावेळी रामटेक लोकसभेचा उमेदवार उमरेड मतदार संघातून राहील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यात भाजपचे माजी आ. सुधीर पारवे आणि कॉंग्रेसचे आमदार राजू पारवे यांची नावे चर्चेत आहे. मात्र महाविकास आघाडी आणि महायुतीत ही जागा कुणाला जाते, यानंतरच उमेदवार निश्चित होतील.

सध्या शिवसनेचे कृपाल तुमाने येथे खासदार आहेत. शिवसेनेतील बंडानंतर तुमाने एकनाथ शिंदे गटात गेले. त्यामुळे भिवापूर तालुक्यात यावेळी ठाकरे आणि शिंदे गटाची किती ताकद आहे, हेही ग्रा. पं. निवडणुकीच्या निमित्ताने स्पष्ट होईल. गत दोन वर्षांपासून उद्योजक प्रमोद घरडे हेही त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून भिवापूरच्या राजकारणात सक्रीय आहेत. ग्रा. पं. निवडणुकीत ते कुणाला साथ देतात, हेही पाहणे महत्त्वाचे ठरेल.

येथे आहेत निवडणुका

भिवापूर तालुक्यात ३६ ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक तर दोन ग्रामपंचायतीत पोटनिवडणूक होत आहे. यात झमकोली, मालेवाडा, चिखली, सालेशहरी, झिलबोडी, उखळी, पाहमी, शिवनफळ, मेढा, तास, धापर्ला (डोये), सालेभट्टी (चोर), शिवापूर, जवराबोडी, विरखंडी, मांडवा (सोम.), जवळी, भागेबोरी, मांडवा (लभान), वाकेश्वर, वासी, नांद, धामनगाव (वि.मं.), भगवानपूर, नक्षी, वडध, बोटेझरी, भिवी, सालेभट्टी (दंदे), पिरावा, कवडसी (बरड), धामनगाव (गवळी), नवेगाव (देश.), मानोरा, सेलोटी, महालगाव येथे सार्वत्रिक तर मरूपार व पांजरेपार या दोन ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणूक होणार आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतnagpurनागपूरElectionनिवडणूक