शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

अवैध टॉवरवर कोण कारवाई करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 22:59 IST

अवैध मोबाईल टॉवरसंदर्भात धोरण निश्चित नसल्याने महापालिकेचा दरवर्षी कोट्यवधीचा महसूल बुडतो. याचा विचार करता नगर रचना विभागाने टॉवर उभारण्यासंदर्भात करावयाचा अर्ज व आवश्यक दस्तऐवजाचा विस्तृत नियमावलीचा प्रस्ताव मंगळवारी विशेष सभेत सादर केला. यावर प्रवीण दटके यांनी आक्षेप घेतला. यात किती दिवसात कारवाई होणार, कोण कारवाई करणार, याबाबत स्पष्टता नसल्याचे निदर्शनास आणले. तसेच विरोधी पक्षाच्या अनेक नगरसेवकांनी प्रस्तावावर प्रश्न उपस्थित करून कारवाईचे अधिकार कुणाला आहे, असा सवाल उपस्थित केला.

ठळक मुद्देमोबाईल टॉवरच्या धोरणावर नागपूर मनपा सभागृहात उपस्थित केले प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अवैध मोबाईल टॉवरसंदर्भात धोरण निश्चित नसल्याने महापालिकेचा दरवर्षी कोट्यवधीचा महसूल बुडतो. याचा विचार करता नगर रचना विभागाने टॉवर उभारण्यासंदर्भात करावयाचा अर्ज व आवश्यक दस्तऐवजाचा विस्तृत नियमावलीचा प्रस्ताव मंगळवारी विशेष सभेत सादर केला. यावर प्रवीण दटके यांनी आक्षेप घेतला. यात किती दिवसात कारवाई होणार, कोण कारवाई करणार, याबाबत स्पष्टता नसल्याचे निदर्शनास आणले. तसेच विरोधी पक्षाच्या अनेक नगरसेवकांनी प्रस्तावावर प्रश्न उपस्थित करून कारवाईचे अधिकार कुणाला आहे, असा सवाल उपस्थित केला.कारवाईचे अधिकार सहायक आयुक्तांकडे असल्याचे नगर रचना विभागाने सांगितले. यावर सदस्यांनी आक्षेप घेत सहायक आयुक्तांकडे आधीच स्वच्छता, मालमत्ता कर, विकास कामे यासह अनेक जबाबदाऱ्या आहेत. अशा परिस्थितीत मोबाईल टॉवरची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविणे संयुक्तिक होणार नाही. तक्रार नेमकी कुणाकडे करावी, किती दिवसात कारवाई होईल. याबाबत स्पष्टता येण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे, अशी भूमिका प्रवीण दटके यांनी मांडली.मागील सात वर्षात मोबाईल टॉवरसंदर्भात कोणत्याही प्रकारचे धोरण नसल्याने महापालिकेचा कोट्यवधीचा महसूल बुडत आहे. याचा विचार करता एक वर्ष अस्थायी स्वरूपात मंजुरी देण्याचा प्रस्ताव आणला आहे. शहरात जुने ७५७ मोबाईल टॉवर व ३४ नवीन टॉवर आहेत, अशी माहिती संजय बंगाले यांनी दिली.सत्तापक्ष नेते संदीप जोशी म्हणाले, कारवाईचा कालावधी व अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्याचा निर्णय आयुक्तांनी घ्यावा, यासाठी उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी. आयुक्त अभिजित बांगर म्हणाले, अवैध मोबाईल टॉवरसाठी नियम बनविण्याचा प्रस्ताव धोरणात्मक होता. तो सभागृहात ठेवण्यात आला. धोरण निश्चित होताच कारवाई करता येईल, सोबतच जबाबदारी निश्चित केली जाईल.ऑरेंज सिटी स्ट्रीटचे शनिवारी भूमिपूजनमहापालिकेच्या महत्त्वाकांक्षी ऑरेंज सिटी स्ट्रीटच्या कामाला लवकरच सुरुवात होत आहे. २ फेब्रुवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. या प्रकल्पातून महापालिकेला ५०० ते १००० कोटींचे उत्पन्न होण्याची अपेक्षा असल्याची माहिती संदीप जोशी यांनी दिली. काही नगरसेवकांनी ऑरेंज सिटी स्ट्रीटच्या फेरबदल प्रस्तावाला विरोध केला. सत्तापक्षाने हा प्रस्ताव मंजूर केला.

टॅग्स :MobileमोबाइलNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका