आज निकाल : ४७,००० मतांचा टप्पा निर्णायकनागपूर: विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातील मतमोजणी मंगळवारी २४ जूनला सकाळी सिव्हिल लाईन्समधील प्रोव्हिडन्स स्कूलमध्ये सुरू होणार असून पदवीधरांच्या निवडणूक परीक्षेत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.पदवीधर मतदारसंघात भाजपचे प्रा.अनिल सोले, काँग्रेसचे प्राचार्य बबन तायवाडे आणि अपक्ष किशोर गजभिये यांच्यासह १४ उमेदवारांचे भवितव्य २० जून रोजी मतपेटीत बंद झाल होते. या मतपेट्या मंगळवारी सकाळी ८ वाजता उघडण्यात आल्यावर प्राध्यापक बाजी मारणार, प्राचार्याला कौल मिळणार की अपक्ष बाजी मारणार हे रात्री ८ वाजताच्या सुमारास स्पष्ट होणार आहे. निवडणुकीत विभागातील सहा जिल्ह्यातील एकूण २ लाख ८८ हजार एकूण मतदारांपैकी १ लाख ७३ मतदारांनी (३४.७ टक्के) मतदान केले. यातून अवैध मतांची संख्या वगळली तर सरासरी प्रथम पसंतीच्या विजयी मताचा कोटा ४६ किंवा ४७ हजार मतांचा राहू शकतो. पहिल्या पसंतीची इतकी मते घेणारा उमेदवार हा विजयी ठरू शकतो.मतमोजणीची तयारीप्रोव्हिडन्स स्कूलमध्ये पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यातील ३१७ केंद्रावरील मतपेट्या कडक बंदोबस्तात सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. सकाळी ८पासून मतमोजणी सुरू होईल. रात्री ९ वाजेपर्यंत ती चालण्याची शक्यता आहे. यासाठी एकूण २४ टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक टेबलवर चार कर्मचारी असतील. एकूण २४८ वर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक टेबलवर प्रत्येकी एक हजार अशी एकाच वेळी २४ हजार मतांची मोजणी केली जाईल. वैध मतांची संख्या निश्चित झाल्यावर त्यापैकी निम्मी मते अधिक एक असा एकूण विजयी मतांचा कोटा निश्चित केला जाईल. (प्रतिनिधी) मतमोजणीची व्यवस्थाएकूण मतदान १ लाख ७३एकूण मतदान केंद्रे ३१७एकूण टेबलची संख्या २४कर्मचाऱ्यांची संख्या २४८एकूण फेऱ्या ४ किंवा ५
‘पदवीधरा’च्या परीक्षेत कोण होणार पास ?
By admin | Updated: June 24, 2014 00:51 IST