शहरं
Join us  
Trending Stories
1
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
2
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
3
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
4
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
5
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
6
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
7
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
8
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
9
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
10
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
11
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
12
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
13
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
14
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
15
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
16
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
17
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
18
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
19
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
20
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी

विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा ‘गेट-वे’ शोधणार कोण?

By admin | Updated: June 23, 2014 01:17 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील राजकारणाचा फटका विद्यार्थ्यांना बसतो आहे. विद्यापीठाने महाविद्यालयांवर ५० टक्के शिक्षकभरतीची अट लादल्यामुळे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील राजकारणाचा फटका विद्यार्थ्यांना बसतो आहे. विद्यापीठाने महाविद्यालयांवर ५० टक्के शिक्षकभरतीची अट लादल्यामुळे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी विनाअनुदानित तुकड्यांमध्ये प्रवेश थांबविण्यात आले आहेत. यामुळे प्रथम वर्षात प्रवेशासाठी वणवण भटकणाऱ्या विद्यार्थ्यांना सोमवारी होणाऱ्या विद्वत परिषदेच्या तातडीच्या बैठकीत दिलासा मिळणार का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार किमान शिक्षकसंख्या निश्चित करण्यासाठी विद्वत परिषदेद्वारे दोन समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या. या समितीतील काही सदस्यांनी महाविद्यालयांना तात्पुरती किमान एक नियमित शिक्षकाची अट लावण्यात यावी व टप्प्याटप्याने सर्व जागांवर नियुक्त्या करण्यात याव्यात, असे मत नोंदविले होते. परंतु प्रत्यक्ष अहवालात मात्र ५० टक्क्यांची अट ठेवण्यात आली. विद्वत परिषदेने प्रभारी कुलगुरू अनुपकुमार यांना प्राधिकृत केल्यामुळे दोन्ही समित्यांच्या अहवालास त्यांनी मान्यता दिली व यासंदर्भातील अधिसूचना जारी करण्यात आल्या. प्राचार्य फोरम व महाविद्यालयांनी या अटींवर नाराजी व्यक्त केली. आर्थिक नुकसान नको म्हणून विनाअनुदानित जागांवरील प्रवेश देणे महाविद्यालयांनी थांबविले आहे. त्यामुळे बारावीत ८० टक्के गुण घेणाऱ्या विद्यार्थ्याला चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळणे अवघड झाले आहे. या मुद्यावर विद्वत परिषदेत चर्चा होण्याची शक्यता आहे.अनधिकृत प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी राजकारण शिगेलाविद्यापीठाने प्रवेशबंदी लावलेली असताना विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याऱ्या महाविद्यालयांसाठी सोमवारच्या विद्वत परिषदेच्या सभेत आणखी काय राजकारण करण्यात येते याकडे विद्यापीठ वर्तुळाचे लक्ष लागले आहे. प्रवेशबंदी असताना ६३ महाविद्यालयांनी ६,६१६ विद्यार्थ्यांना नियमबाह्य पद्धतीने प्रवेश दिले. या विद्यार्थ्यांची विशेष परीक्षा घेण्यात यावी, असे निर्देश राज्य शासनातर्फे देण्यात आले आहे. यासंबंधात विद्वत परिषदेत चर्चा होणार आहे. परंतु मुळात हा विषय परीक्षा मंडळाच्या अखत्यारित असताना विद्वत परिषद त्यावर निर्णय कसा घेऊ शकते, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सहसचिव आर.जी. जाधव यांनी १९ जून २०१४ रोजी विद्यापीठाला पत्र पाठवून प्रवेशबंदी महाविद्यालयातील अनधिकृत प्रवेशित विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याचे आदेश दिले. जाधव यांनी महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ चे कलम ८/४ अन्वये हे आदेश जारी केलेत. वास्तविक पाहता कलम ८/४ अन्वये आदेश काढताना चौकशी करून आदेश काढणे अभिप्रेत आहे. परंतु, कसलीही चौकशी न करता हे आदेश काढण्यात आल्याचा दावा विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी नाव न घेण्याच्या अटीवर केला आहे. नियमबाह्य पद्धतीने प्रवेशित विद्यार्थ्यांना दिलासा मिळावा यासाठी संस्थाचालकांची बाजू घेणारा गट प्रयत्नरत आहे व त्याचेच प्रतिबिंब विद्वत परिषदेच्या बैठकीत पहायला मिळण्याची शक्यता आहे.(प्रतिनिधी)