शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर पं.स.वर झेंडा कुणाचा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 11:47 IST

नागपूर पंचायत समितीवर एक टर्म अपवाद वगळता काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. या पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या सहा जिल्हा परिषद सर्कल व १२ पंचायत समिती गणात काँग्रेसची मजबूत पकड आहे.

ठळक मुद्देभाजपला बंडखोरीचा फटका बसणारकाँग्रेस-भाजप उमेदवारांमध्ये खरी लढत

सुरेश फलके ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: नागपूर ग्रामीण पंचायत समिती ही १२ गणांमध्ये विभागण्यात आली आहे. यात हिंगणा व कामठी विधानसभा मतदारसंघातील काही गावांचा समावेश करण्यात आला आहे. या पंचायत समितीमध्ये मागच्या वेळी भाजपला स्पष्ट बहुमत असल्याने त्यांचीच सत्ता होती. यावेळी भाजपलाही बंडखोरीची लागण झाल्याने याचा फटका पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना बसण्याची शक्यता बळावली आहे. दुसरीकडे, पंचायत समितीच्या १२ ही गणांमध्ये काँग्रेस व भाजपच्या उमेदवारांमध्ये थेट लढत होण्याचे संकेत मिळतात.मावळत्या पंचायत समितीमध्ये भाजपचे सात, काँग्रेसचे चार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक सदस्य होता. स्पष्ट बहुमतामुळे येथे सभापती व उपसभापतिपदही भाजपकडेच होते.ऐन निवडणुकीच्या तोंडावर पंचायत समितीचे माजी उपसभापती सुजित नितनवरे यांनी पक्षाच्या ध्येयधोरणावर टीका करीत भाजपला ‘रामराम’ ठोकला. नितनवरे जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समितीचे सभापती राहिले आहेत. त्यांची लाव्हा परिसरातील मतदारांवर चांगली पकड आहे. त्यामुळे भाजपला फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.नागपूर पंचायत समितीवर एक टर्म अपवाद वगळता काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. या पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या सहा जिल्हा परिषद सर्कल व १२ पंचायत समिती गणात काँग्रेसची मजबूत पकड आहे. मागच्या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र लढल्याने ही बाब भाजपच्या पथ्यावर पडली होती. यावेळी काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी आहे. त्यामुळे त्यांची ताकद वाढल्याने भाजप उमेदवारांची डोकेदुखीही वाढली आहे.या तालुक्यातील जिल्हा परिषद सर्कल व पंचायत समिती गण हिंगणा व कामठी मतदारसंघात विभागले आहेत. त्यामुळे ही निवडणूक माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व आ. समीर मेघे यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली आहे.त्याअनुषंगाने भाजप नेत्यांनी मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली असून, भाजपचे स्थानिक नेते तथा पंचायत समितीचे माजी सभापती अजय बोढारे, तालुकाध्यक्ष अध्यक्ष तथा सरपंच नरेश भोयर, सचिन इंगळे, कमलाकर शेंडे, देवराव कडू, नरेश चरडे, प्रमोद गमे, संजय कुंटे, संजय कपनीचोर, गजानन रामेकर, मधुकर बर्वे ही मंडळी कामाला लागली आहे.दुसरीकडे, काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीसाठी माजी मंत्री रमेश बंग, माजी आमदार विजय घोडमारे, नाना गावंडे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सुनिता गावंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य कुंदा राऊत, संध्या गावंडे, भीमराव कडू यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.शिवाय, भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सरपंच सुरेंद्र बानाईत, माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील जामगडे, प्रणिता कडू, अनिल पाटील, महेश चोखांद्रे, श्याम मंडपे, मुकेश ढोमणे, शैलेश थोराने मतदारांच्या संपर्कात असून, त्यांना शिवसेनेन्या कार्यकर्त्यांची साथ मिळत आहे.सत्तेसाठी कसरतया पंचायत समितीचा बहुतांश भाग हा नागपूर शहरालगत आहे. यावेळी शिवसेना ही भाजपच्या विरोधात असल्याने तसेच काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी असल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे भाजपला सत्ता सांभाळण्यासाठी तर काँग्रेस - राष्ट्रवादी भाजपच्या हातून सत्ता हिसकावण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. सुजित नितनवरे यांनी ऐनवेळी पक्ष सोडल्याने भाजपची ताकत काहिशी कमी झाल्याचेही बोलले जात आहे. भाजपमध्ये अंगर्तत कलह व काँग्रेस - राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत समन्वय असल्याचे दिसून येते.

टॅग्स :Electionनिवडणूक