शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पावर नियंत्रण कुणाचे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 10:53 IST

नागपूर महापालिकेतील पदाधिकारी व अधिकाऱ्यांना स्मार्ट सिटी प्रकल्पाची माहिती नसल्याने या प्रकल्पावर नियंत्रण कुणाचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. याचा प्रत्यय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रश्नोत्तराच्या तासात आला.

ठळक मुद्देपदाधिकाऱ्यांना पडला प्रश्नमनपा प्रशासनही हतबल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात स्मार्ट सिटी प्रकल्पाचे काम सुरू आहे़ नागपूर स्मार्ट अ‍ॅन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून स्मार्ट सिटी प्रकल्प राबविला जात आहे. कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे वेतन महापालिका आयुक्तांच्या दुप्पट तर अधिकाऱ्यांचे वेतन लाखाहून अधिक आहे. या कंपनीचा स्वतंत्र कारभार सुरू आहे. महापालिकेतील पदाधिकारी व अधिकाऱ्यांना स्मार्ट सिटी प्रकल्पाची माहिती नसल्याने या प्रकल्पावर नियंत्रण कुणाचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. याचा प्रत्यय सोमवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रश्नोत्तराच्या तासात आला.नगरसेवक प्रवीण दटके यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत काढण्यात आलेल्या सीसीटीव्ही निविदाबाबत चार महिन्यांपूर्वी विचारलेला प्रश्न सोमवारी सभागृहात चर्चेसाठी आला. या प्रकल्पाचे अधिकारी कोण, त्यांचे कार्यालय कुठे आहे. हा प्रकल्प महापालिकेच्या माध्यमातून राबविला जातो का, केबल डक्ट टाकण्याला स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांकडून परवानगी कशी दिले जाते. सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे खांब, डीपीची स्थिती याला उत्तरदायी कोण? असे प्रश्न दटके यांनी चर्चेच्यावेळी उपस्थित केले. माजी महापौरांनाच स्मार्ट सिटी प्रकल्पाची माहिती मिळत नसल्याचे यातून स्पष्ट झाले. आयुक्त वीरेंद्र सिंह यांच्याकडेही या प्रकल्पासंदर्भात माहिती उपलब्ध नव्हती. उत्तर देण्यास प्रशासन असमर्थ असल्याने स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कामकाजाबाबतचा अहवाल पुढील सभागृहात सादर करण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.हंजरने तीन कोटींचे भंगार परस्पर विकलेभांडेवाडी डम्पिंग यार्ड येथील कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या मेसर्स हंजर बायोटेक एनर्र्जीस प्रा.लि.कंपनीशी झालेल्या करारानुसार हंजरला हा प्रकल्प २०२१ पर्यंत चालवावयाचा आहे. येथील यंत्रसामुग्री वा भंगार कंपनीला महापालिकेच्या परवानगीशिवाय विकता वा हलविता येत नाही. असे असूनही हंजर व्यवस्थापनाने परपस्पर तीन कोटींचे भंगार विकले. यात महापालिकेचे आर्थिक नुकसान झाले. परंतु यासंदर्भात अद्याप हंजर व्यवस्थापनावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली नसल्याबाबतचा प्रश्न भाजपाचे अ‍ॅड. धर्मपाल मेश्राम यांनी उपस्थित केला. यासंदर्भात महापालिका अधिकाऱ्यांनी हंजर व्यवस्थापनाच्या विरोधात गुन्हा दाखल करणे अपेक्षित होते. परंतु भंगार चोरी झाल्याबाबतचे पत्र नंदनवन पोलीस स्टेशनला देण्यात आले. वास्तविक प्रशासनाने हंजर विरोधात गुन्हा दाखल करणे आवश्यक होते, असे मत मेश्राम यांनी मांडले. महापौरांनी या प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा, तसेच हंजर विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका