शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
4
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
5
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
6
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
7
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
8
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
9
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
10
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
11
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
12
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
13
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
14
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
15
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
16
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
17
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
18
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
19
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
20
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
Daily Top 2Weekly Top 5

चुना मारलेली भिंत बोलू लागली आणि खून उघडकीस आला... नागरिकांचा चौकसपणाही कामी आला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 22:28 IST

Nagpur News घरी कार्यक्रम नाही. सण, उत्सवसुद्धा नाहीच. अशावेळी घरातील भिंतीला चुना का मारला. रंगकाम करण्याचे कारण तरी काय, असा प्रश्न नागरिकांना पडला. परिसरात कुजबुज सुरू झाली.

ठळक मुद्देआरोपींना १३ पर्यंत पोलीस कोठडी

अभय लांजेवारलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : घरी कार्यक्रम नाही. सण, उत्सवसुद्धा नाहीच. अशावेळी घरातील भिंतीला चुना का मारला. रंगकाम करण्याचे कारण तरी काय, असा प्रश्न नागरिकांना पडला. परिसरात कुजबुज सुरू झाली. मला 'त्या'दिवशी आवाज आला होता, असे आणखी एक गूढ समोर आले. याच चर्चेच्या बाबींवर नागपूर जिल्ह्यातील उमरेडच्या रेल्वे झोपडपट्टीतील नागरिकांनी बोट ठेवले. ४-५ तास चर्चा गरम झाली. संशयितांना ठाण्यात आणले गेले. रक्ताने माखलेल्या भिंतीवर चुना मारण्याचा प्रकारही उघड्यावर आला. चुना मारलेली भिंत अखेर बोलू लागली. खून झाल्याचा पदार्फाश झाला. (The whitewashed wall started talking and the murder was exposed)

रविवारी, ५ सप्टेंबर रोजी पैशाच्या क्षुल्लक कारणावरून ग्याना रुपराव शेंडे (वय २३, रा. रेल्वे झोपडपट्टी, उमरेड) याला डोक्यावर काठीने प्रहार करून जीवानिशी ठार केले. त्यानंतर पहाटेच्या सुमारास पोत्यात मृतदेह टाकून सायकलवर मांडून निर्जनस्थळी दफन करीत विल्हेवाट लावण्यात आली. उमरेड रेल्वे झोपडपट्टी परिसरात झालेल्या या रहस्यमय घडामोडीनंतर या प्रकरणी नागरिकांची सतर्कता दिसून आली. दुसरीकडे उमरेड पोलिसांचा चालढकलपणासुद्धा चव्हाट्यावर आला.सुरजित ऊर्फ गोलू सखाराम मांडले (वय ३०) आणि विजेन ऊर्फ विजय ऊर्फ सुकळू धनराज करतुले (२२, रा. झोपडपट्टी, उमरेड) यांना अटक झाली. तिघे मित्र होते. लोभापायी मित्रांनीच मित्राचा काटा काढला. परिसरात दहशतीचे वातावरण असून, असामाजिक तत्त्वांचे वाढलेले 'साम्राज्य' चिंतेचा विषय ठरत आहे.५ सप्टेंबरला दुपारी ३ वाजेपासून मृत ग्यानी शेंडे हा घरी नव्हता. सायंकाळ झाली. घरी सर्वजण जेवण करीत होते. दरम्यान, ग्यानी अद्याप का आला नाही, असे विचारचक्र सुरू झाले. सर्वत्र अंधार पसरला होता. पावसाच्या सरीही सुरू होत्या. सर्वत्र विचारणा सुरू झाली. रात्र अधिक गडद होत असतानाही ग्यानी घरी परतला नाही. अशातच झोपडपट्टीमधील अनेकांनी परिसर पिंजून काढला. ग्यानी गवसला नाही. सर्वांचाच हिरमोड झाला.अखेर दुस?्या दिवशी सोमवारी ६ सप्टेंबरला ग्यानी शेंडे हरविल्याची तक्रार देण्यात आली. फारशी चौकशी होत नसल्याचे ध्यानात येताच नागरिकांनीच पुढाकार घेत या घटेनबाबत खुनाचा संशय व्यक्त केला. रंगकाम केलेली भिंत, संशयितांच्या हालचाली, त्यांचा गुन्हेगारी स्वभाव आदी बाबींकडे लक्ष वेधले गेले. त्यानंतर 'त्या' दिशेने पोलिसांचा तपास सुरू झाला. अखेरीस खून करून मृतदेह पुरण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला.पोत्यातून नेला मृतदेहएकीकडे मृताची शोधाशोध सुरू होती, तर दुसरीकडे आरोपींनी लगतच्याच स्वत:च्या घरात मृतदेह पोत्यात कोंबला होता. घटनेदरम्यान रक्त भिंतीवर उडाल्याने भिंत खराब झाली होती. अशातच अगदी पहाटे मृतदेह सायकलवर ठेवून, सुमारे २ कि.मी. अंतरावर सेवामार्गाकडे नेण्यात आला. यासाठी दोन पोते आणि एका सिमेंटच्या बॅगचाही वापर आरोपींनी केला. केबल वायरसाठी खोदकाम करण्यात आलेल्या खड्डयात पुन्हा खड्डा करीत मृतदेह पुरला गेला.शनिवारी (दि.११) उमरेडच्या जेएमएफसी न्यायालयात दोन्ही आरोपींना नेण्यात आले. न्यायालयाने दोन्ही आरोपींना १३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी