शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

‘एमडी’ विकताना नागपुरात निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 00:04 IST

पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाला ‘एमडी’ (मेफड्रॉन) विकताना अटक करण्यात आली आही. सदरमधील एका शाळेजवळ तो ‘एमडी’ची विक्री करीत होता. गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळून १५ हजार रुपये किमतीचे ५ ग्रॅम ‘एमडी’ जप्त करण्यात आले. अमन मसराम (२३) असे आरोपीचे नाव असून, त्याचे वडील ‘एसआरपी’चे निवृत्त कर्मचारी आहेत.

ठळक मुद्देशाळेजवळ देत होता ‘डिलिव्हरी’ : गुन्हे शाखेची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाला ‘एमडी’ (मेफड्रॉन) विकताना अटक करण्यात आली आही. सदरमधील एका शाळेजवळ तो ‘एमडी’ची विक्री करीत होता. गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळून १५ हजार रुपये किमतीचे ५ ग्रॅम ‘एमडी’ जप्त करण्यात आले. अमन मसराम (२३) असे आरोपीचे नाव असून, त्याचे वडील ‘एसआरपी’चे निवृत्त कर्मचारी आहेत.अमन अगोदर एका खासगी बँकेत काम करायचा. मात्र तेथे घोळ केल्याने त्याला सहा महिन्यांअगोदर नोकरी गमवावी लागली. त्यानंतर तो बेरोजगार होता. त्याचे बहुतांश मित्र ‘एमडी’ सेवन करणारे आहेत. त्यामुळेच त्यालादेखील हे व्यसन लागले. त्याच्या व्यसनामुळे कुटुंबीयदेखील त्रस्त होते. पैशांअभावी अमनला व्यसन करणे शक्य होत नव्हते. त्यातूनच त्याने ‘एमडी’ची विक्री करण्यास सुरुवात केली. तरुण तसेच विद्यार्थ्यांना तो ही विक्री करायचा. अमन सदर येथील एका शाळेसमोर ग्राहकाला ‘डिलिव्हरी’ द्यायला आला होता. गुन्हे शाखेच्या ‘एनडीपीएस सेल’ला याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचला व अमनला अटक केली. पोलिसांनी ‘एमडी’ व रोख रकमेसह अ‍ॅक्टिव्हादेखील जप्त केली.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमन मागील सहा महिन्यांपासून ‘एमडी’च्या विक्रीत होता. त्याचे मोठ्या तस्करांशी संबंध आहेत. त्याच्याकडून पोलिसांना अनेक मोठी नावे कळू शकतात. पोलीस आयुक्त डॉ.भूषणकुमार उपाध्याय, सहआयुक्त रवींद्र कदम, उपायुक्त नीलेश भरणे यांच्या मार्गदर्शनात एसीपी सुधीर नंदनवार, निरीक्षक राजू बहादुरे, एपीआय शशिकांत पाटील, एएसआय अविनाश तायडे, हवालदार अजय ठाकूर, संतोष ठाकूर, विनोद मेश्राम, नितीन रांगणे, राहुल गुमगावकर, सचिन सेलोकर, अमोल पडधान तसेच कुंदा जांभुळ यांच्या पथकाने कारवाई केली.१२ दिवसात तीन कारवाई२५ फेब्रुवारी रोजी पाचपावली पोलिसांनी कुख्यात मोहित साहू व त्याच्या साथीदाराला अटक करून ८७ हजार रुपयांचे ‘एमडी’ जप्त केले होते. ४ मार्च रोजी गुन्हे शाखेने आॅटो चालक इरफान खान ऊर्फ सोनू निसार खान याला ६० हजार रुपयांच्या ‘एमडी’सह अटक केली होती. त्याअगोदर गँगस्टर आबू खान व त्याच्या दोन सहकाऱ्यांना ‘एमडी’ तस्करीत अटक झाली.ओडिशातील गांजा तस्कराला अटक‘एनडीपीएस सेल’ने संभलपूर, ओडिशा येथील निवासी रायबीरेंद्र सिंह किरपाल सिंह याला २१ किलो गांजासह अटक केली. या गांजाची किंमत २ लाख १० हजार रुपये आहे. तो ट्रकने नागपूरला आला होता. त्याने अगोदरदेखील शहरात गांजाविक्री केली होती. पोलीस निरीक्षक राजेंद्र निकम, हवालदार तुलसी शुक्ला, दत्ता बागुल, प्रदीप पवार, सतीश पाटील, नितीन मिश्रा, नितीन साळुंके तसेच रुबीना शेख यांच्या पथकाने कारवाई केली.

 

टॅग्स :Drugsअमली पदार्थArrestअटक