लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाळण्यावर खेळता खेळता गोल फिरताना गळफास लागल्यामुळे एका विद्यार्थिनीचा करून अंत झाला. गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी रात्री ही करुणाजनक घटना घडली. श्रुती प्रकाश गजभिये (वय १४) असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून ती आठवीत केंद्रीय विद्यालयात शिकत होती.वायुसेना नगरात राहणारी श्रुती शुक्रवारी रात्री ७ च्या सुमारास घरातील झोक्यावर झोके घेत होती. जोरात झोके घेत असल्याने अचानक झोक्याचा दोर गोल फिरला आणि श्रुतीच्या गळ्याभोवती फास निर्माण झाला. झोका वेगात असल्याने दोर आवळला गेल्यामुळे श्रुतीचा गळफास लागून मृत्यू झाला. प्रकाश बारीकराव गजभिये यांनी दिलेल्या सूचनेवरून गिट्टीखदान पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
खेळता खेळता झोक्याचा दोर बनला फास..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 15:11 IST