शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

कोणते आकाश हे, तू आम्हा नेले कुठे....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2018 8:33 PM

पिढ्यान्पिढ्या गुलामगिरीच्या अंधारात खितपत पडलेल्या कोट्यवधी वंचित, शोषितांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुक्तीचा मार्ग दाखविला. त्यांच्या हातात घटनेचे हत्यार देऊन समाजात ताठ मानेने जगण्यासाठी बुद्ध धम्म दिला. अशा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६२ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी दीक्षाभूमीवर हजारो अनुयायांनी गर्दी केली.

ठळक मुद्देदीक्षाभूमीवर उसळला भीमसागर : महामानवाच्या स्मृतीस विनम्र अभिवादन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पिढ्यान्पिढ्या गुलामगिरीच्या अंधारात खितपत पडलेल्या कोट्यवधी वंचित, शोषितांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुक्तीचा मार्ग दाखविला. त्यांच्या हातात घटनेचे हत्यार देऊन समाजात ताठ मानेने जगण्यासाठी बुद्ध धम्म दिला. अशा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६२ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी दीक्षाभूमीवर हजारो अनुयायांनी गर्दी केली. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी गुरुवारी सकाळपासून अनुयायांनी दीक्षाभूमीवर गर्दी केली. पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून अनुयायी कुटुंबीयांसह दीक्षाभूमीवर दाखल झाले. दीक्षाभूमीवर स्तुपाकडे जाण्याच्या मार्गावर दुतर्फा पंचशील ध्वज लावले होते. कृतज्ञ अनुयायांनी आपल्या उद्धारकर्त्याला आदरांजली वाहिली. दीक्षाभूमीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीला अनुयायांनी अभिवादन केले. दिवसभर अनुयायांचे जत्थे दीक्षाभूमीकडे कूच करताना दिसले. सायंकाळीही मोठ्या प्रमाणात दीक्षाभूमीवर लोकांचे जाणे सुरु होते. कुटुंबासह आलेल्या नागरिकांनी अभिवादन करण्यासह काही काळ या प्रेरणाभूमीवर घालविला. कुटुंबासह आलेले नागरिक हा क्षण आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करताना दिसले. अनेकांनी दीक्षाभूमीच्या बाहेरील रस्त्यावर लागलेल्या दुकानांमधून बुद्धमूर्ती, पुस्तकांची खरेदी केली. रात्री उशिरापर्यंत दीक्षाभूमीवर अनुयायांनी महामानवाला अभिवादन करण्यासाठी गर्दी केली.दरम्यान संविधान चौकातही महामानवाला अभिवादन करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक संघटनांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. या परिसरात विविध संघटनांच्या बैठका व सभाही पार पडल्या. शहरातील विविध बुद्ध विहारांमधून उपासक-उपासिकांची अभिवादन रॅली संविधान चौकात पोहचत होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, अशा घोषणांनी हा परिसर निनादला होता. बाबासाहेबांच्या स्मृतींना उजाळा देत अनेकांनी मनोगत व्यक्त केले. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत संविधान चौकात अनुयायांची गर्दी पहावयास मिळाली.दीक्षाभूमीवर घालविला दिवसमहापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरातील अनेक नागरिकांनी दीक्षाभूमीवर एकच गर्दी केली. नागरिकांनी अख्खा दिवस कुटुंबीयांसह दीक्षाभूमीवर घालविला. सोबतच जेवणाचे डबे आणले होते. दीक्षाभूमीच्या परिसरातील हिरवळीवर सतरंजी टाकून अनुयायी कुटुंबासह भोजन करताना दिसले. दिवसभर दीक्षाभूमीवर घालविल्यानंतर सायंकाळी अनुयायी घरी परतले.भजनातून पेरले बाबासाहेबांचे विचार 
दीक्षाभूमीवर मुरलीधर सूर्यवंशी आणि प्रतिमा सूर्यवंशी या दाम्पत्याने महापरिनिर्वाण दिनानिमित्त दिवसभर भजने, भीमगीते सादर केली. भजनाच्या माध्यमातून त्यांनी बाबासाहेबांचे विचार पेरण्याचे काम केले. मागील ३० वर्षांपासून सूर्यवंशी दाम्पत्य दीक्षाभूमीवर भीमगीते सादर करून महामानवाचे विचार अनुयायांमध्ये पेरण्याचे काम करीत आहे. दरम्यान अंबाझरीच्या धम्मदीप गायन पार्टीतर्फे गायक मनोज निकाळजे, राहुल पाटील, राजेंद्र वाहणे, धीरज निकाळजे, गणेश जयगडी, नामदेव पखाले, अभिषेक मसराम, उमेश बागडे व संचाने अनुयायांचे मनोरंजन केले. ‘तुझीच कमाई आहे भीमाई...कबिरा कहे ये जग अंधा.....तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे रं...’अशी गाणी सादर करून त्यांनी अनुयायांमध्ये बाबासाहेबांचे विचार पेरले.

 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरDiksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमी