शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात सिमेंट रोडच्या दर्जाहीन कामांसाठी कोणते अधिकारी जबाबदार आहेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 22:48 IST

आरपीएस इन्फ्राप्रोजेक्टस् कंपनीने केलेली सिमेंट रोडस्ची कामे दर्जाहीन असल्यास त्याची माहिती देण्यात यावी व त्यासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांची नावेही कळविण्यात यावी असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महानगरपालिकेला दिले आहेत. यासंदर्भात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी १ आॅगस्टपर्यंत वेळ देण्यात आला आहे.

ठळक मुद्देहायकोर्टाचा सवाल : मनपाला १ आॅगस्टपर्यंत मागितले प्रतिज्ञापत्र

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आरपीएस इन्फ्राप्रोजेक्टस् कंपनीने केलेली सिमेंट रोडस्ची कामे दर्जाहीन असल्यास त्याची माहिती देण्यात यावी व त्यासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांची नावेही कळविण्यात यावी असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महानगरपालिकेला दिले आहेत. यासंदर्भात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी १ आॅगस्टपर्यंत वेळ देण्यात आला आहे.याविषयी रणरागिणी जनकल्याण संस्थेच्या अध्यक्षा मनषा पापडकर यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. आरपीएस कंपनीला सिमेंट रोड बांधकामाचे कंत्राट देण्यावर त्यांचा आक्षेप आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व झेड. ए. हक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, आरपीएस कंपनीला मुंबई महानगरपालिकेने काळ्या यादीत टाकले असल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता हे आदेश दिले. कंपनीला कामांची पूर्ण रक्कम अदा केली जाऊ शकते की, काही रक्कम रोखून धरता येऊ शकते हेदेखील मनपाने पडताळून पहावे असे न्यायालयाने सांगितले आहे. तसेच, यावर योग्य प्रतिज्ञापत्र दाखल न केल्यास पुढच्या तारखेला मनपा आयुक्तांनी न्यायालयात व्यक्तिश: उपस्थित रहावे अशी तंबी देण्यात आली आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. योगेश मंडपे व अ‍ॅड. विलास डोंगरे यांनी कामकाज पाहिले.कन्सल्टन्ट नियुक्तीवरून फटकारलेमहापालिकेने रोड बांधकामाचे निरीक्षण करण्यासाठी कन्सल्टन्टची नियुक्ती केली आहे. यावरून न्यायालयाने मनपाला फटकारले. कन्सल्टन्टची नियुक्ती करून मनपाच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांची जबाबदारी झटकणे मान्य केले जाऊ शकत नाही असे मत न्यायालयाने व्यक्त केले. तसेच, कन्सल्टन्टला आतापर्यंत किती रक्कम अदा करण्यात आली याची माहिती देण्यास सांगितले. आवश्यकता पडल्यास ती रक्कम अभियांत्रिकी विभागातील तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केली जाईल असे संकेतही न्यायालयाने दिले.असे आहे याचिकाकर्त्यांचे म्हणणेमहानगरपालिकेने आरपीएस कंपनीला सहाव्या व आठव्या टप्प्यातील सिमेंट रोडस् बांधण्याचे कंत्राट दिले आहे. कंत्राट देताना कंपनीचा इतिहास तपासण्यात आला नाही. कंपनीचे काम निकृष्ट दर्जाचे आहे. त्यामुळे मनपाला निवेदन सादर करून कंपनीचे कंत्राट रद्द करण्याची मागणी केली होती, पण त्याची दखल घेण्यात आली नाही असे संस्थेचे म्हणणे आहे. प्रकरणाची सखोल चौकशी करून कंपनीचे कंत्राट रद्द करण्याची व दोषी अधिकाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई करण्याची विनंती न्यायालयाला करण्यात आली आहे.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका