शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

कोणत्या अधिकारी, कंत्राटदारांविरुद्ध गुन्हे नोंदवले ? हायकोर्टाची पोलीस आयुक्तांना विचारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 00:30 IST

रोडवरील धोकादायक खड्यांसाठी जबाबदार असलेल्या कोणकोणत्या अधिकारी व कंत्राटदारांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांना केली.

ठळक मुद्देरोडवरील खड्यांमुळे होताहेत गंभीर अपघात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रोडवरील धोकादायक खड्यांसाठी जबाबदार असलेल्या कोणकोणत्या अधिकारी व कंत्राटदारांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांना केली. तसेच, यावर येत्या ३ ऑक्टोबरपर्यंत अधिकारी व कंत्राटदारांच्या नावांसह विस्तृत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचा आदेश दिला.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व पुष्पा गणेडीवाला यांच्यासमक्ष सुनावणी झाली. शहरामध्ये रोडवरील धोकादायक खड्यांमुळे गेल्या पाच महिन्यात झालेल्या अपघातात एका नागरिकांचा मृत्यू झाला तर, २९ नागरिक गंभीर व किरकोळ जखमी झाले. रोडवरील खड्डे नागरिकांसाठी जीवघेणे ठरत असल्यामुळे न्यायालयाने यासंदर्भात स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. गेल्या तारखेला न्यायालयाने या अपघात प्रकरणांत किती व कुणा-कुणाविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले याची माहिती सादर करण्याचे निर्देश डॉ. उपाध्याय यांना दिले होते. त्यानुसार, डॉ. उपाध्याय यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले, पण गुन्हे दाखल करण्यात आलेल्या अधिकारी व कंत्राटदारांची नावे त्यात नसल्यामुळे न्यायालयाचे समाधान झाले नाही. परिणामी, वरील आदेश देण्यात आला.प्रतिज्ञापत्रातील माहितीनुसार, प्राणघातक अपघात प्रकरणात २२ एप्रिल २०१९ रोजी लकडगंज पोलिसांनी टिप्पर चालक व बीएसएनएल कंत्राटदाराविरुद्ध तर, अन्य एका अपघातानंतर २९ मे २०१९ रोजी सदर पोलिसांनी मंगळवारी झोनचे संबंधित अधिकारी व कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा नोंदवला. तसेच, इतर २२ प्रकरणांतही विविध कलमांखाली एफआयआर नोंदविण्यात आले. परंतु, आरोपींची नावे न्यायालयाला सांगण्यात आली नाही. त्यामुळे न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. या प्रकरणात अ‍ॅड. राहील मिर्झा न्यायालय मित्र असून, सरकारतर्फे अ‍ॅड. सुमंत देवपुजारी यांनी कामकाज पाहिले.अपघात कक्ष स्थापनवाहतूक विभागाने १ जानेवारी २०१८ रोजी अपघात कक्ष स्थापन केला. कक्षातील कर्मचारी अपघातस्थळी जाऊन आवश्यक अभ्यास केल्यानंतर उपाययोजनांसह अहवाल सादर करतात. नागरिकांना सूचना फलकांद्वारे अपघात प्रवण स्थळांची माहिती दिली जाते. आवश्यक उपाययोजना केल्यामुळे २०१७ व २०१८ सालच्या तुलनेत यावर्षी १७ प्राणघातक व ४४ अन्य अपघात कमी झाले. वाहतूक विभागाने जनमंच संस्थेच्या सहकार्याने ३२ धोकादायक खड्डे बुजवले. कंत्राटदारांना रोडची दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले. संबंधित विभागांना यासंदर्भात पत्रे पाठवली अशी माहितीदेखील डॉ. उपाध्याय यांनी न्यायालयाला दिली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयPoliceपोलिसcommissionerआयुक्त