शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जे महाराष्ट्रात शक्य नाही, ते त्रिपुरात करून दाखविणार; बिप्लब कुमार देब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 11:46 IST

त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब हे तसे तर त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी जास्त चर्चेत असतात. मात्र त्यांच्यातील अभ्यासू चेहरा मंगळवारी नागपुरात अनुभवायला मिळाला. वैज्ञानिक प्रगतीसोबतच राज्याला ‘इकोफ्रेंडली’ बनवायचे आहे. तसेच कृषी क्षेत्राचा दर्जा उंचावून महात्मा गांधी यांचे स्वप्न पूर्ण करण्यावर आपला भर असल्याची भावना त्यांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केली.

ठळक मुद्देराज्याला जैविक व ‘इकोफ्रेंडली’ बनविणारमहात्मा गांधींचे स्वप्न पूर्ण करणार

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब हे तसे तर त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी जास्त चर्चेत असतात. मात्र त्यांच्यातील अभ्यासू चेहरा मंगळवारी नागपुरात अनुभवायला मिळाला. वैज्ञानिक प्रगतीसोबतच राज्याला ‘इकोफ्रेंडली’ बनवायचे आहे. तसेच कृषी क्षेत्राचा दर्जा उंचावून महात्मा गांधी यांचे स्वप्न पूर्ण करण्यावर आपला भर असल्याची भावना त्यांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केली.जैविक शेती ही काळाची गरज आहे. त्रिपुरात कृषीमध्ये जैविक पद्धतीचा वापर जास्तीत जास्त कसा वाढेल यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. आमच्या राज्यात अगोदरपासूनच अननस, चहा, जॅकफ्रुट, संत्री, काजू बादाम, आले इत्यादींचे जैविक पद्धतीने उत्पादन होते. महाराष्ट्राच्या तुलनेत त्रिपुराचे क्षेत्रफळ लहान आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांना जे जमणार नाही ते आम्ही त्रिपुरात करुन दाखवू शकतो. ईशान्येत सिक्कीम हे पूर्णपणे जैविक शेती करणारे देशातील पहिले राज्य होते. आम्ही महाराष्ट्राच्या अगोदर त्रिपुराला जैविक राज्य करुन दाखवू शकतो, असा विश्वास बिप्लब कुमार देब यांनी व्यक्त केला. यासाठी आम्ही पावले उचलली असून कृषी क्षेत्राला मजबूत करण्यासाठी योजना राबविण्यात येत आहेत. ग्रामस्वराज्यातून देशाचा विकास हे महात्मा गांधींचे स्वप्न होते. त्याच आधारावर नरेंद्र मोदी हेदेखील काम करत असून आम्ही हे स्वप्न पूर्ण करून दाखवू, असे ते म्हणाले. मनरेगा तसेच इतर योजनांच्या माध्यमातून आम्ही राज्यभरात अननस तसेच बांबू यांचे वृक्षारोपण करत असल्याचेदेखील त्यांनी सांगितले.

‘इकोफ्रेंडली’ विकास साधणारईशान्येकडील राज्यांमध्ये पूर ही एक मोठी समस्या आहे. वनांची तोड होत असल्यामुळे ही समस्या विक्राळ रूप घेत आहे. सर्वोच्च न्यायालयाने ईशान्येकडील राज्यांमधील एकही झाड कापले जाऊ नये, असे निर्देश दिले होते. यात नंतर थोडी शिथिलता आणण्यात आली. आता बांबूच्या झाडांचीदेखील तोड करण्याची परवानगी देण्यात आहे. यामुळे माती वाहून जाण्याचे प्रमाण वाढले आहे. राजधानी आगरतळा येथेदेखील प्रचंड समस्या आहे. या समस्यांवर तंत्रज्ञान आणि पर्यावरण यांची सांगड घालून उत्तर शोधण्यात येईल. केवळ पर्यावरणाच्या मागे लागून अनेकदा पर्यावरणाचे नुकसान करण्यात येते. आम्ही मात्र राज्याचा ‘इकोफ्रेंडली’ विकास साधू, असा दावा त्यांनी ‘लोकमत’जवळ केला.

गडकरी हे तर ‘सुपरफास्ट’ नेतेयावेळी बिप्लब कुमार देब यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांची प्रशंसा केली. गडकरी हे ‘सुपरफास्ट’ नेते आहेत. त्रिपुराला ‘इकोफ्रेंडली’ राज्य बनविण्यासाठी कर्नाटकातील भीमबांबू लावा, इथेनॉलचे उत्पादन वाढवा, असे सल्ले त्यांनी दिले आहेत. इतकेच काय तर पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याशी तात्काळ चर्चादेखील करवून दिली. ईशान्येकडील राज्यांमध्ये बांबू मोठ्या प्रमाणावर होतो. याच बांबूच्या माध्यमातून देशाचे सुमारे एक लाख कोटींचे नुकसान टाळता येईल, असे देब म्हणाले.त्रिपुरातील पूर परिस्थितीवर नीरीचा तोडगात्रिपुरात गेल्या अनेक काळापासून पुराची समस्या असून यामुळे पावसाळ््यात प्रचंड नुकसान होते. या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा कशा पद्धतीने निघू शकतो यासंदर्भात त्यांनी नीरीचीच्या वैज्ञानिकांशी चर्चा केली. नीरीच्या वैज्ञानिकांचे संशोधन त्यांनी स्वत: समजावून घेतले. नीरीच्या वैज्ञानिकांनी हिमाचल प्रदेश तसेच उत्तराखंडमध्ये बांबूसदृश झाडांच्या मदतीने जमिनीची धूप थांबविली होती. येथील काही वैज्ञानिकांनी त्रिपुरात कामदेखील केले आहे. त्यांच्या मदतीने त्रिपुराची समस्या दूर करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Biplab Debबिप्लब देव