शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
2
आजचे राशीभविष्य : शनिवार ११ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ होईल, हितशत्रू सरसावतील, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
3
संपादकीय: राखेतून शांतता उगवेल? ट्रम्प इस्रायल-हमास युद्ध थांबवू शकणार?
4
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
5
लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
6
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
7
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
8
नोबेल नायतर नाय, तात्यांना थेट ‘महा-नोबेल’च! गावातच भांडणं लावायला आणि ती ‘मिटवायला’...
9
तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर
10
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित
11
‘अर‌-ट्टाय’ काय आहे? ते व्हॉट्सॲपला पर्याय ठरेल? 
12
आधी धुरळा कुणाचा? जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीबाबत निर्णय दिवाळीनंतर
13
घुंगट, बुरखाधारी महिला मतदारांची पटवणार ओळख; बिहार निवडणुकीत घेणार अंगणवाडी सेविकांची मदत
14
दहशतवादासाठी आमची भूमी वापरू देणार नाही; अफगाणिस्तानचे भारताला आश्वासन
15
शांततेचा नोबेल: हुकूमशाहीकडून लोकशाहीकडे नेणारी रणरागिणी; २० वर्षांचा लढा जिंकली
16
प्रवीण आमरेने दिलेले बूट नाही विसरणार : सचिन तेंडुलकर
17
अमली पदार्थ तस्करीत १०० कोटींचे व्यवहार; ईडीचे नऊ ठिकाणी छापे
18
चांगले साहित्य सहानुभूती निर्माण करते; ‘अनंतरंग’ सांस्कृतिक महोत्सवात गीतकार जावेद अख्तर यांचे प्रतिपादन
19
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
20
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!

हृदयरोग असो वा अ‍ॅलर्जी, कोरोना लस घ्यायलाच हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:08 IST

नागपूर : कोरोनाचा सर्वाधिक धोका ज्येष्ठ नागरिकांना, ज्यांना रक्तदाब, मधुमेह, मूत्रपिंड आणि हृदय रोग आहेत त्यांना आहे. म्हणूनच सरकारने ...

नागपूर : कोरोनाचा सर्वाधिक धोका ज्येष्ठ नागरिकांना, ज्यांना रक्तदाब, मधुमेह, मूत्रपिंड आणि हृदय रोग आहेत त्यांना आहे. म्हणूनच सरकारने तिसऱ्या टप्प्यात याच नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात केली आहे. परंतु अनेक लाभार्थी गैरसमजुतीपोटी लस घेण्यास समोर येत नसल्याचे दिसून येत आहे. परंतु ही लस सर्वच दृष्टिकोनातून सुरक्षित असल्याने कोणतेही आजार असल्यास, अ‍ॅलर्जीसुद्धा असल्यास नि:संकोचपणे घ्यावी, असे आवाहन तज्ज्ञ डॉक्टरांनी केले आहे.

कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला १६ जानेवारीपासून सुरुवात झाली. कोरोना आणीबाणीच्या काळात ज्यांनी रुग्णसेवा दिली त्या हेल्थ वर्करचे पहिल्या टप्प्यात लसीकरण सुरू झाले. दुसऱ्या टप्प्यात ‘फ्रंट लाईन वर्कर’ तर तिसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरील व ४५ वर्षांवरील गंभीर आजार असलेल्या लाभार्थ्यांचे लसीकरण सुरू आहे. सीरम इन्स्टिट्यूटची ‘कोविशिल्ड’ व भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ लस दिली जात आहे. ६० वर्षांवरील ज्येष्ठांचे रोज ५ ते ६ हजार तर ४५ वर्षांवरील गंभीर आजार असलेल्या एक ते दीड हजार लाभार्थ्यांचे लसीकरण होत आहे. ८ मार्चपर्यंत जवळपास ३५ हजार ज्येष्ठांचे तर गंभीर आजार असलेल्या १० हजार लाभार्थ्यांनी लस घेतली आहे. लसीकरणासाठी शहरात शासकीयसह खासगी रुग्णालयातील ५५ केंद्रांवर तर ग्रामीणमध्ये १५ केंद्रांवर लस दिली जात आहे. कोरोना प्रतिबंधक लस घेणे गरजेचे असले तरी, अनेकांच्या मनात याविषयी शंका आहेत. यासंदर्भात ‘लोकमत’ने डॉक्टरांशी चर्चा केली असता, ही लस सुरक्षित असून, त्यापासून कोणताही धोका किंवा दुष्परिणाम नसल्याचे त्यांनी सांगितले. रक्तदाब, मधुमेह, मूत्रपिंड आणि हृदय रोगच नव्हे तर ज्यांना अ‍ॅलर्जी असेल त्यांनीही लस घेण्याचे आवाहन केले आहे.

-मूत्रपिंड विकाराच्या आजाराच्या रुग्णांसाठी लस फायद्याची

मूत्रपिंड विकाराच्या रुग्णांमध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते. अशावेळी कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका अधिक राहतो. संसर्ग झाल्यास रुग्णांमध्ये गुंतागुंत वाढून आजार गंभीर होण्याची शक्यता अधिक असते. ते टाळण्यासाठी प्रत्येकांनी कोरोनाची लस घेणे गरजेचे आहे.

- डॉ. संजय कोलते

मूत्रपिंड प्रत्यारोपण तज्ज्ञ

- ताप आला तरी घाबरू नये...

लसीकरणानंतर ताप येणे, लस दिलेल्या जागी खाज सुटणे, हात दुखणे, थकल्यासारखे वाटणे आदी त्रास होऊ शकतो. ही एक सामान्य प्रतिक्रिया आहे. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. आजपर्यंत कोणताही गंभीर दुष्परिणाम झाल्याचे उदाहरण नाही. यामुळे ६० वर्षांवरील ज्येष्ठांनी व ४५ वर्षांवरील गंभीर आजार असलेल्यांनी लस घेणे गरजेचे आहे.

- डॉ. पिनाक दंदे, वरिष्ठ फिजिशियन

- लसीचे दुष्परिणाम नाही

हृदयरोग किंवा मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी कोरोना प्रतिबंधक लस घेण्यास काहीही हरकत नाही. लसीचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. उलट लस न घेणे म्हणजे आपली रिस्क वाढवून घेण्यासारखेच आहे. त्यामुळे प्रत्येकाने ही लस घेतलीच पाहिजे.

- डॉ. आनंद संचेती, हृदयरोग तज्ज्ञ