शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मिहानमधील वाघोबा लपला कुठे? पिंजरे लावण्याचीही शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 23:22 IST

मिहान परिसरात शुक्रवारी दिसलेला वाघ शनिवारी पुन्हा दिवसभर दिसलाच नाही. एवढेच नाही तर परिसरात लावलेल्या कोणत्याही कॅमेऱ्यामध्ये तो ट्रॅप झाला नाही. त्यामुळे त्याच्या शोधासाठी निघालेल्या पथकाला शनिवारी हात हलवितच परतावे लागले.

ठळक मुद्देपथकांची संख्या वाढविणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मिहान परिसरात शुक्रवारी दिसलेला वाघ शनिवारी पुन्हा दिवसभर दिसलाच नाही. एवढेच नाही तर परिसरात लावलेल्या कोणत्याही कॅमेऱ्यामध्ये तो ट्रॅप झाला नाही. त्यामुळे त्याच्या शोधासाठी निघालेल्या पथकाला शनिवारी हात हलवितच परतावे लागले.वनविभागाच्या पथकाशी त्याचा सुरू असलेला लपंडाव जवळपास १५ दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे रविवारी सकाळी त्याच्या शोधासाठी पुन्हा पथकांची संख्या वाढविली जाण्याची शक्यता आहे. वाघ दिसल्यानंतर त्याला पकडण्यासाठी पिंजरे लावण्याचा किंवा त्याला त्याच्या संरक्षित अधिवास क्षेत्रात हाकलण्याचाही प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे. शुक्रवारी २९ नोव्हेंबरला मिहानमधील इन्फोसिस कंपनीच्या मागील भागात असलेल्या नहराजवळ लावलेल्या कॅमेऱ्यामध्ये तो ट्रॅप झाला होता तर त्यापूर्वी बुधवारी २७ नोव्हेंबरच्या रात्री इन्फोसिस कंपनीच्या सीसीटीवी फुटेजमध्येही तो आला होता.त्याचा या परिसरातील वावर आणि अधिक काळापासून मांडलेले ठाण स्थानिकांसाठी धोकादायक ठरले आहे. हे लक्षात घेता गुरुवारच्या रात्री नागपूर विभागाचे मुख्य वनसंरक्षक कल्याण कुमार यांनी मिहान परिसराचा दौरा करून आढावा घेतला व पाहणी केली. शुक्रवारी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या चमूलाही घटनास्थळांचे निरीक्षण करण्याच्या सूचना दिल्या.१५ दिवसांपूर्वी वाघ मिहानमधील इन्फोसिस कंपनीच्या मागील भागात एका कर्मचाऱ्याला दिसला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या परिसरात त्याच्या पंजाचे ठसेही मिळाले होते. दोन दिवसानंतर पुन्हा इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांनी वाघ दिसल्याचा दावा केला होता. या काळात वनविभागाने आधी १५ व नंतर ३० कॅमेरे लावले होते. याच काळात बुटीबोरी रेंजमधील सुमठाना, वाकेश्वर, खडका, सोंडापारपर्यंत फिरून गुरुवारी २७ नोव्हेंबरला तो पुन्हा मिहानमध्ये परतला आहे.अंबाझरीतील बिबट्याचाही शोध सुरूअंबाझरी जंगलाच्या अंबाझरी जैव विविधता पार्कमध्ये गुरुवारी दिसलेल्या बिबट्याच्या पगमार्कनंतर प्रत्यक्ष त्याचा मात्र शोध लागलेला नाही. शनिवारी पथकाने दिवसभर त्याचा शोध घेतला. मात्र पत्ता लागला नाही. गुरुवारी मॉर्निंग वॉकला आलेल्या नागरिकांना पार्कच्या कक्ष क्रमांक ७९७ मध्ये हे पगमार्क दिसले होते. त्यानंतर सुरक्षेचा उपाय म्हणून तीन दिवसपर्यंत पार्क पर्यटनासाठी बंद ठेवण्यात आले होते. दोन दिवस शोध घेऊनही कुठेच पत्ता लागलेला नाही. रविवारी पुन्हा पथकांकडून शोध घेतला जाणार आहे.

टॅग्स :MihanमिहानTigerवाघ