शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

‘ती’ सध्या आहे कुठे ?

By admin | Updated: January 30, 2017 02:24 IST

निवडणुकांचे पडघम वाजले...पक्षाच्या उमेदवारीसाठी अर्जदेखील भरला...मुलाखतींमध्ये ‘इम्प्रेस’ करणारे

काँग्रेस-भाजपातील इच्छुकांसमोर प्रश्न : बैठकांचा जोर सुरूच नागपूर : निवडणुकांचे पडघम वाजले...पक्षाच्या उमेदवारीसाठी अर्जदेखील भरला...मुलाखतींमध्ये ‘इम्प्रेस’ करणारे सादरीकरणदेखील केले. मात्र काँग्रेस भाजपासह सर्वच पक्षांतर्फे उमेदवारांची यादी अद्यापही जाहीर न झाल्यामुळे उमेदवारांच्या मनातील घालमेल वाढीस लागली आहे. नामांकन अर्ज दाखल करण्याची तारीख जवळ येत असताना मात्र इच्छुकांच्या मनात एकच प्रश्न घोळत आहे. ‘ती’ सध्या आहे कुठे ? भाजपाकडे तीन हजारांहून तर काँग्रेसकडे अकराशेहून अधिक इच्छुकांचे उमेदवारीसाठी अर्ज आले होते. यात प्रस्थापित नगरसेवकांसोबतच, पक्षाच्या शहर कार्यकारिणीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा समावेश होता. ६ ते १४ जानेवारी या कालावधीत भाजपातर्फे एकूण तीन हजार तीन इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. तर काँग्रेसच्या मुलाखती ८ ते १० जानेवारी या कालावधीत झाल्या. मुलाखती झाल्यानंतर आता उमेदवारांची यादी कधीपर्यंत जाहीर होते याकडे इच्छुकांच्या नजरा लागलेल्या आहेत. कार्यकर्त्यांमध्ये विविध कयास लावण्यात येत आहेत. शिवाय विविध चर्चांनादेखील उधाण आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री या दोघांनीही भाजपाच्या बहुतांश उमेदवारांच्या नावाला हिरवा कंदील दाखविलेला आहे. तर काँग्रेस कमिटीतर्फेदेखील नावे जवळपास ‘फायनल’ करण्यात आली आहेत. (प्रतिनिधी) काँग्रेसची यादी २ तारखेला ? शहराध्यक्ष आ.सुधाकर कोहळे यांना यासंदर्भात विचारणा केली असता यादी योग्य वेळ आल्यावर जाहीर होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. दोन ते तीन दिवसांत पहिली यादी येण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. दुसरीकडे काँग्रेसची यादीदेखील याच कालावधीत येण्याची शक्यता आहे. २ फेब्रुवारी रोजी यादी जाहीर करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. कोहळेंची गडकरींशी चर्चा उमेदवारांची यादी अंतिम करण्यासाठी शनिवारी रात्री भाजपाच्या संसदीय मंडळाची बैठक झाली. या बैठकीत ठरविण्यात आलेली नावे रविवारी नितीन गडकरींकडे सादर करण्यात आली. विधानसभा निवडणूक प्रचाराचे व्यस्त वेळापत्रक असतानादेखील गडकरी नागपुरातील घडामोडींकडे बारीक लक्ष ठेवून आहेत. ते सकाळी गुवाहाटीवरुन नागपूरला आले. दुपारी शहराध्यक्ष सुधाकर कोहळे यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी गडकरींशी चर्चा केली. यात गडकरी यांनी काही सूचना दिल्या, अशी माहिती सूत्रांनी दिली.