शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
2
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
3
खऱ्याखुऱ्या विराट कोहलीने पान टपरीवाल्याला केला कॉल, नंतर पोलीस त्याच्या घरी पोहचले अन्...
4
HDFC-ICICI बँकेच्या शेअर्समुळे बाजार गडगडला! पण, 'या' क्षेत्राने दिली साथ; कशात झाली वाढ?
5
माझा काही संबंध नाही, काँग्रेसने परवानगीशिवाय 'तो' व्हिडिओ वापरला; केके मेननचे स्पष्टीकरण
6
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
7
शाओमी YU7 च्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड, अवघ्या दोन मिनिटांत ३ लाख बुकींग!
8
१९ वर्षे असते शनि महादशा, ‘या’ राशींना मिळतो अपार पैसा, भाग्योदय; भरभराट, भरघोस लाभच लाभ!
9
धक्कादायक! लोकोपायलटच्या जाग्यावर तिसराच व्यक्ती बसला, मोठा गोंधळ उडाला, अनेकांचा जीव धोक्यात; व्हिडीओ व्हायरल
10
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
11
प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
12
पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!
13
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
14
ना करुण नायर, ना श्रेयस अय्यर, ना साई सुदर्शन... ३ नंबर बॅटिंगसाठी गांगुलीची कुणाला पसंती?
15
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?
16
कोण आहेत १२४ वर्षीय मिंता देवी? ज्यांच्या नावाचं टी-शर्ट घालून विरोधकांचा संसदेत राडा!
17
पंजाब पोलिसांची मोठी कारवाई; बब्बर खालसा संघटनेशी संबंधित ५ दहशतवाद्यांना अटक
18
आसिम मुनीर यांना सारखं अमेरिकेत बोलावून भारतच नव्हे, तर 'या' तीन देशांनाही इशारा देतायत डोनाल्ड ट्रम्प!
19
'परम सुंदरी'च्या रोमँटिक केमिस्ट्रीवर भाळले प्रेक्षक, सिनेमात कॉमेडीचाही तडका; ट्रेलर रिलीज
20
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता

मान्सून रुसला कुठे? नागपुरात २१४.८ मिमी पावसाचीच नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 11:45 IST

जून महिन्यात मान्सूनने दगा दिला. जुलै महिन्याचा पहिला आठवडाही कोरडा गेला. विशेषत: विदर्भ आणि मराठवाड्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा ३० ते ३१ टक्के पाऊस कमी पडला आहे.

ठळक मुद्देसरासरीपेक्षा ३०-३१ टक्के कमी पाऊस 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जून महिन्यात मान्सूनने दगा दिला. जुलै महिन्याचा पहिला आठवडाही कोरडा गेला. विशेषत: विदर्भ आणि मराठवाड्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा ३० ते ३१ टक्के पाऊस कमी पडला आहे. अशा परिस्थितीत पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण झाले आहे. भर पावसाळ्यात ही परिस्थिती असेल तर येणाऱ्या दिवसात दुष्काळ पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा पावसाकडे लागल्या आहेत.नागपूर शहर व ग्रामीण भागात जुलै महिन्यात सर्वाधिक पाऊस होतो. परंतु यंदा मान्सून रुसून बसला आहे. १ जूनपासून आतापर्यंत २१४.८ मिमी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. साधारणपणे या एकाच महिन्यात सरासरी ३०० मि.मी. इतका पाऊस पडत असतो. बंगालच्या खाडीत तयार होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मध्य भारतात पाऊस पडतो. परंतु सध्या पावसासाठी अनुकूल असे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत नाही.अशावेळी येणाºया दिवसात परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे. विदर्भात १४ जुलैपर्यंत सरासरी ३०३.५ मि.मी. इतका पाऊस होतो. परंतु यावर्षी २१२.१ मि.मी. इतक्याच पावसाची नोंद झाली आहे. जी साधारणपणे ३० टक्के कमी आहे. तसेच मराठवाड्यात सरासरी २१०.५ मि.मी. इतका पाऊस होतो. परंतु आतापर्यंत केवळ १४४.९ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. जी सरासरीपेक्ष ३१ टक्के कमी आहे.राज्यातील इतर भागांमध्ये मात्र मान्सूनची विशेष मेहरबानी दिसून येत आहे. मध्य महाराष्ट्रात ससरासरीपेक्षा १५ टक्के अधिक पाऊस झाला. येथे २६३.० मि.मी. पाऊस होतो. यावर्षी आतापर्यंत ३०१.५ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झालेली आहे. कोकण आणि गोवा येथे सरासरी ११५८.५ मि.मी. इतका पाऊस होता. यावर्षी सरासरी पेक्षा २० टक्के अधिक म्हणजेच १३९२.१ मि.मी. इतक्या पावसाची नोंद केली.

शेजारील राज्याची स्थिती चांगलीमध्य प्रदेश आणि छत्तीसगड या शेजारील राज्यातील स्थिती चांगली आहे. पश्चिम मध्य प्रदेशात सरासरीपेक्षा २१ टक्के अधिक पाऊस नोंदविण्यात आला. पूर्व मध्य प्रदेशात मात्र सरासरीपेक्षा ६ टक्के कमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.पश्चिम मध्य प्रदेशात २६७.७ आणि पूर्व मध्य प्रदेशात २७०.१ मि.मी. इतक्या पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. येथे सरासरी २२१.५ आणि २८४.४ मि.मी. इतका पाऊस होत असतो.छत्तीसगडमध्ये यंदा सर्वात अगोदर मान्सून दाखल झाला होता. परंतु येथे सरासरीपेक्षा १३ टक्के कमी पाऊस झाला आहे. येथे सरासरीपेक्षा ३५५.८ मि.मी. इतका पाऊस होतो. परंतु आतापर्यंत ३०९.२ मि.मी. इतक्या पावसाचीच नोंद करण्यात आलेली आहे.

विदर्भात नागपूर सर्वाधिक उष्णसलग दुसऱ्या दिवशीही नागपूर हे विदर्भात सर्वाधिक उष्ण राहिले. दुपारी ४ नंतर १५ मिनिट चांगला पाऊस झाला. परंतु तो समाधानकारक राहिला नाही. रविवारी कडक उन्हामुळे तापमान ३७.१ डिग्री सेल्सिअस इतके राहिले. ते सरासरीपेक्षा ५ डिग्री अधिक होते. वर्धेत कमाल तापमान ३६.५ डिग्री, ब्रह्मपुरीमध्ये ३६.४ डिग्री, अकोला ३६.१, चंद्रपूरमध्ये ३६ डिग्री सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले आहे.

टॅग्स :Monsoon Specialमानसून स्पेशल