शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
2
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
3
लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
4
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
5
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
6
तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर
7
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित
8
आधी धुरळा कुणाचा? जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीबाबत निर्णय दिवाळीनंतर
9
घुंगट, बुरखाधारी महिला मतदारांची पटवणार ओळख; बिहार निवडणुकीत घेणार अंगणवाडी सेविकांची मदत
10
दहशतवादासाठी आमची भूमी वापरू देणार नाही; अफगाणिस्तानचे भारताला आश्वासन
11
शांततेचा नोबेल: हुकूमशाहीकडून लोकशाहीकडे नेणारी रणरागिणी; २० वर्षांचा लढा जिंकली
12
प्रवीण आमरेने दिलेले बूट नाही विसरणार : सचिन तेंडुलकर
13
अमली पदार्थ तस्करीत १०० कोटींचे व्यवहार; ईडीचे नऊ ठिकाणी छापे
14
चांगले साहित्य सहानुभूती निर्माण करते; ‘अनंतरंग’ सांस्कृतिक महोत्सवात गीतकार जावेद अख्तर यांचे प्रतिपादन
15
Royal Enfield: आता घरबसल्या बूक करा रॉयल एनफील्ड, 'हे' मॉडेल्स ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध!
16
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
17
प्रेमासाठी काय पण! पाकिस्तानी कपलने सीमा ओलांडून भारतात केला प्रवेश, 'अशी' झाली पोलखोल
18
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
19
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!
20
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?

मन शुद्ध जेथे, वसे बुद्ध तेथे... उपसकांनी गजबजली दीक्षाभूमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 22:29 IST

वैशाख पौर्णिमेला महाकारु णिक तथागत गौतम बुद्ध यांचा जन्म झाला. याच दिवशी त्यांना महाबोधी ज्ञानप्राप्ती झाली तर याच दिवशी त्यांचे महापरिनिर्वाण झाले. म्हणूनच हे साऱ्या जगासाठी बुद्धपर्व आहे. हे बुद्धपर्व शनिवारी नागपुरातील सर्वच बुद्ध विहारांमध्ये पंचशील ध्वजारोहणाने, बुद्धवंदनेच्या ग्रहणातून, रॅली काढून व सामूहिक प्रवचनांच्या आयोजनातून साजरे झाले. सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत पवित्र दीक्षाभूमीवर उपासक-उपासिकांनी ‘ बुद्धम् सरणंम् गच्छामी’ या त्रिशरण आणि पंचशीलेच्या जयघोषात शुद्ध आचरण आणि सत्य बोलण्याचा संकल्प केला.

ठळक मुद्देबुद्धं, सरणं, गच्छामी...ने दुमदुमली उपराजधानी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वैशाख पौर्णिमेला महाकारु णिक तथागत गौतम बुद्ध यांचा जन्म झाला. याच दिवशी त्यांना महाबोधी ज्ञानप्राप्ती झाली तर याच दिवशी त्यांचे महापरिनिर्वाण झाले. म्हणूनच हे साऱ्या जगासाठी बुद्धपर्व आहे. हे बुद्धपर्व शनिवारी नागपुरातील सर्वच बुद्ध विहारांमध्ये पंचशील ध्वजारोहणाने, बुद्धवंदनेच्या ग्रहणातून, रॅली काढून व सामूहिक प्रवचनांच्या आयोजनातून साजरे झाले. सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत पवित्र दीक्षाभूमीवर उपासक-उपासिकांनी ‘ बुद्धम् सरणंम् गच्छामी’ या त्रिशरण आणि पंचशीलेच्या जयघोषात शुद्ध आचरण आणि सत्य बोलण्याचा संकल्प केला. शहरात ठिकठिकाणी व विहारांमध्ये धम्मप्रसाद म्हणून खीर वाटपाचा कार्यक्रम झाला.  

शनिवारी पहाटे पासूनच पांढऱ्याशुभ्र कपड्यांमध्ये, पंचशीलचा ध्वज हातात घेत बुद्धाचा उपासक आणि बाबासाहेबांचा अनुयायी दीक्षाभूमीला अभिवादन करण्यासाठी कधी मिरवणुकीने तर कधी जत्थ्याजत्थ्याने येत होता. पांढऱ्या पोशाखातील निळ्या पाखरांच्या थव्यांनी दीक्षाभूमी गजबजून गेली. येथे येणारा प्रत्येक उपासक तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व स्तुपातील पवित्र अस्थिकलाशाला वंदन करून जात होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्यावतीने सकाळीच बुद्धवंदना ग्रहण करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत दीक्षाभूमीवर बुद्ध वंदनेचा अखंड जयघोष सुरु होता. सायंकाळ नंतर दीक्षाभूमीवर गर्दी झाली होती. बहुसंख्य उपासक कुटुंबासमवेत आले होते. 
अनेकांनी येथे सामूहिक भोजनही केले. दीक्षाभूमीवर बुद्धगीते, भीमगीतांसह पुस्तकांच्या स्टॉलनी गजबजली होती. रात्री उशिरापर्यंत बुद्ध पौर्णिमेच्या पर्वावर दीक्षाभूमीवरील भव्य स्मारकाची दारे दर्शनासाठी उघडी ठेवण्यात आली होती.

टॅग्स :Buddha Purnimaबुद्ध पौर्णिमाDiksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमी