शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

लतादीदींच्या आठवणींचा ‘जहाँ जाईएगा हमे पाईयेगा’

By admin | Updated: September 29, 2014 01:04 IST

लतादीदी म्हणजे रसिकांच्या गळ्यातील ताईतच. लतादीदींचे गीत ऐक ले नाही, असा एकही दिवस रसिकांचा जात नाही. कितीही व्यस्ततेत असलो तरी लतादीदींचे गाणे कधीतरी कानावर

कलासंगमचे आयोजन : स्वरधाराचे सादरीकरण नागपूर : लतादीदी म्हणजे रसिकांच्या गळ्यातील ताईतच. लतादीदींचे गीत ऐक ले नाही, असा एकही दिवस रसिकांचा जात नाही. कितीही व्यस्ततेत असलो तरी लतादीदींचे गाणे कधीतरी कानावर पडतेच आणि रसिक मग हे गाणे बराच काळ गुणगुणत राहतात. लतादीदींचा मधाळ स्वर लाभलेली अनेक गीते रसिकांच्या मनात अजरामर झाली आहेत. या स्वरकोकीळेच्या वाढदिवसानिमित्त दीदींच्या गीतांचा कार्यक्रम म्हटल्यावर रसिकांनी खच्चून गर्दी केली. कार्यक्रमाचे शीर्षकही जहाँ जाईयेगा हमे पाईयेगा असे होते. या कार्यक्रमात रसिकांनी दीदींच्या गीतांचा आनंद घेतला. कलासंगम संस्थेच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सायंटिफिक सभागृहात हा कार्यक्रम स्वरधारा संस्थेच्यावतीने सादर करण्यात आला. गायक ईशा रानडे आणि योगेंद्र रानडे यांनी यावेळी गीते सादर करून रसिकांना आनंद दिला. श्वेता शेलगावकर यांचे निवेदन लतादीदींच्या अनेक आठवणींचा पट उलगडणारे होते. यानिमित्ताने गीतकार हसरत जयपुरी, प्रेम धवन, शैलेंद्र, मजरूह सुल्तानपुरी आदींच्या गीतांचा आनंद आणि सलिल चौधरीपासून अनिल विश्वास, शंकर-जयकिशन, मदन मोहन, एस. डी, लक्ष्मीकांत प्यारेलाल आदींच्या संगीताची जादू रसिकांनी अनुभविली. ‘आएगा आनेवाला...’ या गीताने ईशाने कार्यक्रमाला प्रारंभ केला. यानंतर काही स्वंतंत्र तर काही युगल गीते इशा आणि योगेंद्र यांनी सादर करून रसिकांची दाद घेतली. यावेळी ‘ओ सजना बरखा बहार आयी.., नैनो मे बदरा छाए.., सीने मे सुलगते है अरमां.., याद किया दिल ने.., वो चुप रहे तो...देखो रुठा ना करो.., रहे ना रहे हम, मनमोहना बडे झुठे, दिल की नजर से, मुझे कितना प्यार है तुमसे, धीरे धीरे चल.., अजी रुठकर अब कहाँ जाईयेगा, रसिक बलमा, व जब याद आये, ये जिंदगी उसिकी है...’ आदी गीतांचा गुलदस्ता रसिकांच्या पुढ्यात आला. कार्यक्रमाची संकल्पना प्रद्युम्न सहस्त्रभोजनी, सशेधन डॉ. सुहास देशपांडे, विवेक देशपांडे, ध्वनी पराग घुसे, रंगमंच राजेश अमीन, प्रकाशव्यवस्था सुनील व मायकेल यांची होती. वाद्यांवर गोविंद गडीकर, रघुनंदन परसतवार, अरविंद उपाध्ये, मोरेश्वर दहासहस्त्र, श्रीकांत पिसे, गौरव टांकसाळे, निशिकांत देशमुख, उज्ज्वला गोकर्ण यांनी साथसंगत केली. (प्रतिनिधी)