शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवारचा २० हजार कोटींचा निधी गेला कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 12:19 IST

राज्यकर्त्यांनी मोठा गाजावाजा करून जलयुक्त शिवार योजनेवर गेल्या चार वर्षात २० हजार कोटींचा निधी खर्च केला. भूगर्भातील पाण्याची पातळी वाढल्याचा दावा केला जात आहे.

ठळक मुद्देआकडेवारी जाहीर करण्याची मागणीकाँग्रेसची दुष्काळ पाहणी समिती विदर्भाच्या दौऱ्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यकर्त्यांनी मोठा गाजावाजा करून जलयुक्त शिवार योजनेवर गेल्या चार वर्षात २० हजार कोटींचा निधी खर्च केला. भूगर्भातील पाण्याची पातळी वाढल्याचा दावा केला जात आहे. दुसरीकडे राज्यात गेल्या १५ ते २० वर्षात पडला नाही असा भीषण दुष्काळ आहे. राज्यातील २२ जिल्ह्यात तीव्र स्वरुपाची पाणीटंचाई व गुरांच्या चाºयाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. धरणे कोरडी पडली, विहिरी व बोरवेल आटल्या. भूगर्भातील पाण्याची पातळी दिड ते दोन हजार फुटावर गेली आहे. लोकांची पाण्यासाठी पायपीट सुरू आहे. मग शासनाने जलयुक्त शिवार योजनेवर खर्च केलेला निधी गेला कुठे असा सवाल करून विधीमंडळातील काँग्रेसचे उपनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी जलयुक्त शिवारमुळे नेमका कोणता लाभ झाला. याची आकडेवारी जाहीर करण्याची मागणी केली.विदर्भातील दुष्काळग्रस्त बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ अमरावती व नागपूर जिल्ह्याची पाहणी करण्यासाठी काँग्रेसने विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे. सोमवारपासून या दौºयाला सुरूवात केली आहे. दौºयावर रवाना होण्यापूर्वी विजय वडेट्टीवार लोकमतशी बोलत होते.बुलडाणा जिल्ह्यातील ८५ टक्के गावे टंचाईग्रस्त आहेत. जून महिन्यात या जिल्ह्यातील शंभरटक्के गावे टंचाईग्रस्त होतील अशी परिस्थिती आहे. अशी गंभीर परिस्थिती असूनही शासनाने दुष्काळ निवारणासाठी एक रुपयाही खर्च केलेला नाही. बुलढाणा जिल्ह्यातील अनेक गावे अशी आहेत की जिथे बाराही महिने टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. बाब इतकी गंभीर आहे की त्या गावांमध्ये साधी नळयोजना सुद्धा नाही.जलव्यवस्थापनाची कोणतीही प्रभावी कामे जिल्ह्यात केली गेली नसल्याने बुलढाणा जिल्ह्यातील भूगर्भ जलपातळी खूप खालावली आहे. विहिरी, कूपनलिका तसेच तलाव सर्वकाही कोरडे पडले आहेत . दुष्काळग्रस्त गावांचा दौरा करून नागरिकांच्या समस्या जाणून घेऊ . यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करू. बुलडाणा प्रमाणेच विदभार्तील सहा जिल्ह्यातील परिस्थिती कमी अधिक प्रमाणात सारखीच आहे. लोकांना पिण्यासाठी पाणी व गुरांसाठी चारा छावण्याची तातडीने व्यवस्था करण्याची गरज आहे. परंतु सरकार दुष्काळाबाबत गंभीर दिसत नाही. दुष्काळग्रस्त जिल्ह्यांच्या दौºयानंतर मागणी केल्यानुसार सरकारने उपाययोजना केल्या नाही तर काँग्रेस तालुका, जिल्हा व राज्य स्तरावर तीव्र आंदोलन उभारून सरकारला तातडीने उपाययोजना करण्यास भाग पाडू असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला.

 

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवार