शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

शक्ती कायद्याची अंमलबजावणी राज्य सरकार कधी करणार?

By कमलेश वानखेडे | Updated: February 27, 2025 18:35 IST

विजय वडेट्टीवार यांचा सवाल : नागपुरातून पोलीस आयुक्तांना पुण्यात हफ्ते वसूलीसाठी पाठवले का?

कमलेश वानखेडे, नागपूर लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पुण्यात एसटी स्थानकात झालेल्या बलात्काराची जबाबदारी राज्य सरकारची आहे. महाविकास आघाडी सरकारने शक्ती कायदा आणला होता, पण या कायद्याची अंमलबजावणी होत नाही. बलात्कार होऊन देखील अजूनही आरोपी पकडला जात नाही यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंदवडे निघाले आहेत, अशी टीका काँग्रेस विधी मंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली.

नागपुरात गुरुवारी पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, पुण्याचे पोलिस आयुक्त आधी नागपूरमध्ये होते. पुण्यात गेल्यावर गुन्हेगारांची परेड केली, पुढे काय झालं . आता पुण्यात जाऊन हफ्ते वसूली करण्यात व्यस्त आहेत का, असा सवाल करीत पोलिसांचा धाक उरलेला नाही, त्यामुळे महिला अत्याचाराच्या घटना वाढल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. पुणे बस स्थानकातील बसमध्ये जे सामान सापडले, बसचा वापर हा महिलांवर अत्याचार करण्यासाठी होत होता का? तिथे सुरक्षा रक्षक असताना बलात्कार घडला राज्यात गृह खात्याची इभ्रत गेली. येत्या अधिवेशनात आम्ही प्रश्न उपस्थित करू, असा इशाराही वडेट्टीवार यांनी दिला.

छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्यांना सुरक्षाराज्यात एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्यांना सुरक्षा दिली जाते. राहुल सोलापूरकर असेल किंवा प्रशांत कोरटकर असेल यांच्यावर कारवाई होत नाही. उलट ते आरएसएस संबंधित असल्याने त्यांना अभय दिले जाते. भाजप यांच्या विरोधात निषेध करत नाही, आता तोंड का शिवली गेली,असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला.

टॅग्स :nagpurनागपूरVijay Vadettiwarविजय वडेट्टीवार