शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

सात लाखांच्या दंडाची वसुली होणार कधी?

By admin | Updated: May 12, 2016 02:57 IST

अन्न व औषधी प्रशासन विभागाने गेल्या तीन वर्षांत सुमारे साडेनऊ कोटी रुपये किमतीचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त केला आहे.

‘एफएसएसए’अंतर्गत कारवाई : तीन वर्षांत साडेनऊ कोटींचे प्रतिबंधित अन्नपदार्थ जप्तनागपूर : अन्न व औषधी प्रशासन विभागाने गेल्या तीन वर्षांत सुमारे साडेनऊ कोटी रुपये किमतीचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त केला आहे. ‘एफएसएसए’च्या (फूड सेफ्टी अ‍ॅन्ड स्टँडर्डस् आॅथोरिटी) नियमांतर्गत या कालावधीत २८७ न्यायिक प्रकरणे निश्चित करण्यात आली व दोषींना ४१ लाखांहून अधिकचा दंड ठोठावण्यात आला. परंतु यापैकी सुमारे साडेसात लाख रुपयांचा दंड अद्यापही वसूल करण्यात आलेला नाही. माहितीच्या अधिकाराअंतर्गत ही बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत अन्न व औषध प्रशासन विभागाकडे विचारणा केली होती. २०१३ पासून किती कारवाई झाली, यात किती मुद्देमाल जप्त झाला तसेच दोषींना किती दंड ठोठावण्यात आला, यासारख्या मुद्यांबाबत त्यांनी माहिती मागितली होती. प्राप्त झालेल्या माहितीनुसार एप्रिल २०१३ ते मार्च २०१६ या कालावधीत विभागातर्फे ३१९ कारवाई करण्यात आल्या. यात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा १५ हजार ९२४ किलो वजनाचा ९ कोटी ४७ लाख २५ हजार २४३ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. या कालावधीत ‘एफएसएस’च्या कलम ६८ अंतर्गत ३८७ न्यायालयीन प्रकरणे दाखल करण्यात आली. यातील २८७ प्रकरणे निश्चित झाली व २४८ प्रकरणांमध्ये दोषींना दंड ठोठावण्यात आला. दोषींना एकूण ४१ लाख १ हजार ६३ रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. परंतु यातील ७ लाख ४६ हजार ४०० रुपयांचा दंड संबंधितांनी भरलेलाच नाही किंवा त्याची वसुली झालेली नाही. यातील ३५ हजारांचा दंड हा प्रत्यक्ष पाहणीच्या वेळी दोषी आढळलेल्यांना करण्यात आला होता. १९१ प्रकरणांत नमुन्यांमध्ये अनियमितता आढळल्यामुळे दंड ठोठावण्यात आला.(प्रतिनिधी)