शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

१.६० लाख कोटींच्या योजना केव्हा पोहोचतील गरिबांपर्यंत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 11:30 IST

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोविड सवलत योजनेंतर्गत आज १.६० लाख कोटींचे दुसरे पॅकेज प्रवासी मजूर, आदिवासी, रस्त्यावरील फेरीवाले व शेतकऱ्यांसाठी जाहीर केले. पण या सवलती गरिबांपर्यंत केव्हा पोहोचतील, हा लाखमोलाचा प्रश्न आहे.

सोपान पांढरीपांडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोविड सवलत योजनेंतर्गत आज १.६० लाख कोटींचे दुसरे पॅकेज प्रवासी मजूर, आदिवासी, रस्त्यावरील फेरीवाले व शेतकऱ्यांसाठी जाहीर केले. पण या सवलती गरिबांपर्यंत केव्हा पोहोचतील, हा लाखमोलाचा प्रश्न आहे.आज जाहीर झालेल्या ९ सवलतींमध्ये प्रवासी मजुरांना दोन महिने मोफत अन्न पुरविण्यासाठी ३,५०० कोटी, मुद्रा शिशू कर्ज व्याज सवलतीसाठी १,५०० कोटी, पंतप्रधान आवास योजनेतील मध्यमवर्गीयांच्या घरासाठी अनुदान म्हणून ७० हजार कोटी, ५० लाख फेरीवाल्यांना प्रत्येकी १० हजार, कर्जासाठी ५ हजार कोटी, आदिवासी रोजगारासाठी ६ हजार कोटी व शेतकऱ्यांना अतिरिक्त कर्जासाठी ३० हजार कोटी अशा एकूण १.६० लाख कोटींच्या सवलती आहेत.यातील प्रवासी मजुरांसाठी स्वस्त भाड्याची घरे बांधण्याची योजना सरकारी आणि खासगी क्षेत्रांच्या सहभागाने होणार आहे. टोल-रस्ते जसे बांधले जातात तशीच ही योजना आहे. या घरांसाठी सरकार व खासगी जमीन मालक केव्हा तयार होतील व ही घरे केव्हा तयार होतील, हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. त्यामुळे या योजनेचे यश अधांतरी आहे. असाच प्रकार फेरीवाल्यांच्या १० हजार रुपये कर्जाचा आहे. आज फेरीवाल्यांच्या दुकानातील मालसाठाही २ ते ३ लाखांचा असतो. अशा स्थितीत १० हजार रुपये कर्जपुरवठा ही हास्यास्पद बाब आहे. त्याचा फेरीवाल्यांना फारसा फायदा नाही.प्रधानमंत्री आवास योजनेतील वार्षिक ६ ते १८ लाख रुपये उत्पन्न असणाºया मध्यमवर्गीयांना २.६७ लाख रुपये अनुदान मिळते. ही योजना ३१ मार्च २०२० वरून एक वर्षासाठी वाढविण्यात आली आहे. या योजनेचा फायदा २.५० लाख कुटुंबांना होईल, अशी सरकारला आशा आहे. परंतु लॉकडाऊन संपल्यानंतर एक वर्षात ही घरे पूर्ण होतील का, हा खरा प्रश्न आहे. आजच्या पॅकेजमधील शेतकऱ्यांना २.५० कोटी किसान क्रेडिट कार्ड, मुद्रा शिशू कर्ज, ७० हजार कोटींचे अतिरिक्त पीक कर्ज व आदिवासी रोजगारांसाठी ६ हजार कोटी, भारतभर एकच रेशनकार्ड चालणार, या स्वागतार्ह सवलती आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकूण २० लाख कोटींच्या कोविड पॅकेजची घोषणा केली होती. त्यापैकी रिझर्व्ह बँकेने ५.७४ लाख कोटी व २४ मार्चच्या पॅकेजमध्ये अर्थमंत्र्यांनी १.७० लाख कोटी अशा ७.४४ लाख कोटींच्या सवलती जाहीर झाल्या होत्या. काल व आज मिळून अर्थमंत्र्यांनी ७.८० लाख कोटींच्या सवलती जाहीर केल्या आहेत. त्यामुळे आता केवळ ४.७६ लाख कोटींच्या सवलती जाहीर व्हायच्या आहेत.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसGovernmentसरकार