शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

समस्या कधी सुटणार?

By admin | Updated: December 13, 2014 03:08 IST

उपराजधानीतील वाहतूक कोंडी, पार्किंग, रखडलेले प्रकल्प, अतिक्रमण इत्यादी समस्यांवर उपाय शोधण्यासाठी स्थापन समितीने ...

नागपूर : उपराजधानीतील वाहतूक कोंडी, पार्किंग, रखडलेले प्रकल्प, अतिक्रमण इत्यादी समस्यांवर उपाय शोधण्यासाठी स्थापन समितीने समाधानकारक कार्य केले नसल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी राज्य शासनाची कानउघाडणी केली. मुख्य सचिव समितीचे प्रमुख असतानाही कासवगतीने कार्य सुरू असल्याची बाब न्यायालयाला खटकली. न्यायालय म्हणाले, हे प्रकरण शासनाच्या विविध विभागांशी संबंधित आहे. एका विभागाला जाब विचारला तर तो विभाग दुसऱ्या विभागाकडे बोट दाखवितो. एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याचा प्रकार टाळण्यासाठी मुख्य सचिवांना समितीचे प्रमुख करण्यात आले आहे. ते सर्व नोकरशाहीचे प्रमुख आहेत. त्यांना भरपूर अधिकार देण्यात आले आहेत. ते दोन विभागांतील भांडण सहज संपवून उपाय शोधू शकतात. संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक आदेश देऊ शकतात. यामुळे त्यांना समितीचे प्रमुख करण्यात आले आहे. त्यांनी चौका-चौकात जाऊन समस्यांचा अभ्यास करावा हा उद्देश नाही. ते उपसमित्या स्थापन करून अहवाल मागवू शकतात, अशी समज न्यायालयाने दिली. कोणी अधिकारी मुख्य सचिवांचे ऐकत नसेल, तर अशा अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यास न्यायालय सक्षम आहे, असेही न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले.या समस्यांशी संबंधित १० जनहित याचिकांवर न्यायालयात एकत्र सुनावणी करण्यात येत आहे. समितीने नागपूर शहर व सभोवतालच्या परिसरातील वाहतूक कोंडी व पार्किंगच्या समस्येचा शोध घ्यावा व त्यावर अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना सुचवाव्यात. समितीने न्यायालयात चर्चा झालेल्या विषयापुरतेच मर्यादित राहू नये. समिती जनहिताच्या दृष्टिकोनातून आवश्यक तो अभ्यास करण्यास व उपाय सुचविण्यास स्वतंत्र आहे, असे न्यायालयाने समिती स्थापन करताना म्हटले होते. परंतु, समितीने आदेशाचे काटेकोर पालन केले नाही. परिणामी न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांनी वरीलप्रमाणे खडेबोल सुनावून शासनाच्या विनंतीवरून समितीला पुन्हा तीन महिन्यांचा वेळ वाढवून दिला. पुढील सुनावणी येत्या १३ मार्च रोजी निश्चित करण्यात आली आहे. न्यायालयाने समितीमध्ये मुख्य सचिव, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव, परिवहन विभागाचे सचिव, नगर रचना विभागाचे संचालक, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक व उपाध्यक्ष, महानगरपालिका आयुक्त, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, वाहतूक पोलीस उपायुक्त व नागपूर जिल्हाधिकारी यांचा समावेश केला आहे. (प्रतिनिधी)