शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्रलंबित सिंचन प्रकल्प कधी पूर्ण करणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 01:32 IST

विदर्भातील ४५ सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात येतील, अशी हमी राज्य शासनाने दिली होती. मात्र मागील चार वर्षांत हे प्रकल्प पूर्ण का झाले नाही व हे प्रकल्प कधी पूर्ण करणार अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केली आहे. सोबतच दोन आठवड्यात कालबद्ध कार्यक्रमदेखील सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

ठळक मुद्देउच्च न्यायालयाकडून शासनाला विचारणा : दोन आठवड्यात कालबद्ध कार्यक्रम सादर करण्याचे निर्देश

लोकमत न्यूज  नेटवर्कनागपूर : विदर्भातील ४५ सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात येतील, अशी हमी राज्य शासनाने दिली होती. मात्र मागील चार वर्षांत हे प्रकल्प पूर्ण का झाले नाही व हे प्रकल्प कधी पूर्ण करणार अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केली आहे. सोबतच दोन आठवड्यात कालबद्ध कार्यक्रमदेखील सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.लोकनायक बापूजी अणे स्मारक समितीने विदभार्तील सिंचन अनुशेषाकडे लक्ष वेधणारी जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर न्या. रवी देशपांडे व न्या. विनय जोशी यांच्या खंडपीठासमोर बुधवारी सुनावणी झाली. गेल्या चार वर्षात केंद्र सरकारच्या पंतप्रधान कृषी सिंचन योजनेतून काही प्रकल्प पूर्ण केल्याचा दावा करण्यात आला आहे. तेव्हा ते प्रकल्प नेमके कोणते आहेत, त्याबाबत माहिती सादर करण्याची विनंती याचिकाकर्त्यांकडून न्यायालयाला करण्यात आली. विदर्भात सुमारे अडीच लाख हेक्टरहून अधिक जमिनीला अद्याप सिंचन सुविधा मिळालेल्या नाहीत. काही प्रकल्प अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. तर काही प्रकल्प निव्वळ कागदावरच आहेत. प्रलंबित प्रकल्प पूर्ण केल्यास शेतकऱ्यांना सिंचन सुविधा मिळणार आहेत. तेव्हा त्या प्रकल्पांना कधी पूर्ण करणार त्याबाबत कालबद्ध कार्यक्रम सादर करण्याचे आदेश द्यावेत, अशीही विनंती करण्यात आली.त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने किती प्रकल्प १०० टक्के पूर्ण झालेत, किती प्रकल्प अपूर्ण आहेत, ते अपूर्ण प्रकल्प किती कालावधीत पूर्ण करणार त्याचा कालबद्ध कार्यक्रम सादर करण्याचे निर्देश दिले आहे. याचिकाकर्त्यांच्यावतीने अ‍ॅड.अविनाश काळे, अ‍ॅड. भारती काळे यांनी बाजू मांडली.अगोदरदेखील झाली होती याचिकायाअगोदरदेखील लोकनायक बापूजी अणे स्मारक समितीने प्रलंबित प्रकल्पांबाबत याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने जलसंपदा खात्याला प्रलंबित सिंचन प्रकल्पाची यादी सादर करण्याचा आदेश दिला. त्यानुसार सुमारे ४५ प्रमुख प्रकल्पांची यादी सादर करण्यात आली होती. सदर प्रकल्प प्रलंबित असण्याची कारणे आणि ते प्रकल्प किती कालावधीत पूर्ण होतील त्याची माहिती देण्यात आली होती. तसेच तीन ते चार वर्षात सर्व प्रकल्प पूर्ण होतील, अशी हमी न्यायालयात देण्यात आली होती. त्याआधारे सदर याचिका निकाली काढण्यात आली होती. मात्र न्यायालयाला दिलेल्या आश्वासनानुसार कोणत्याही प्रकल्पाचे काम पूर्ण झाले नाही, असे आढळून आल्याने समितीने परत उच्च न्यायालयात धाव घेतली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प