शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

नागपुरातील खाऊ गल्ली कधी खाऊ घालणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 00:06 IST

नागपूर शहरातील अनेक बाजारपेठेत रस्त्यांच्या कडेला फूटपाथवर खाद्यपदार्थ विक्रीचे ठेले उभे राहतात. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. याचा विचार करता खाद्यपदार्थ विक्रे त्यांना गांधीसागर तलावाच्या बाजूला मोकळ्या जागेत खाऊ गल्ली निर्माण करण्याचा निर्णय तीन वर्षापूर्वी स्थायी समितीने घेतला होता. त्यानुसार येथे ३२ डोम उभारण्यात आले होते. परंतु गेल्या दोन वर्षापासून ते वापराविना पडून असल्याने खाऊ गल्ली कधी खाऊ घालणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

ठळक मुद्देजाचक अटीमुळे निविदाला प्रतिसाद नाही : प्रकल्पातील कामे अर्धवट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहरातील अनेक बाजारपेठेत रस्त्यांच्या कडेला फूटपाथवर खाद्यपदार्थ विक्रीचे ठेले उभे राहतात. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. याचा विचार करता खाद्यपदार्थ विक्रे त्यांना गांधीसागर तलावाच्या बाजूला मोकळ्या जागेत खाऊ गल्ली निर्माण करण्याचा निर्णय तीन वर्षापूर्वी स्थायी समितीने घेतला होता. त्यानुसार येथे ३२ डोम उभारण्यात आले होते. परंतु गेल्या दोन वर्षापासून ते वापराविना पडून असल्याने खाऊ गल्ली कधी खाऊ घालणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.. केंद्र शासनाकडे पाठविण्यात आलेल्या राज्य सरोवरे संवर्धन प्रस्तावात गांधीसागर तलावाचा समावेश आहे. यात गांधीसागर तलावाचे सौंदर्यीकरण प्रस्तावित आहे. पर्यटन स्थळ म्हणून विकसित केले जाणार आहे. याचा विचार करता खाऊ गल्लीचे बांधकाम करण्यात आले आहे. यावर जवळपास ८० लाखांचा खर्च करण्यात आला आहे. ३२ डोम बांधून तयार आहेत. परंतु वापरावविना पडून असल्याने काही डोमचे स्लॅब निघण्याला सुरुवात झाली आहे.कसे वाढणार उत्पन्नमहापालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न सुरू असल्याचा दावा पदाधिकारी व अधिकाऱ्यांकडून केला जातो. प्रत्यक्षात खाऊ गल्लीच्या माध्यमातून भाडे स्वरुपात महापालिकेला वर्षाला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. मात्र गेल्या दोन वर्षात याचा लिलाव करण्यात आलेला नाही. डोमचा वापर होत नसल्याने दुरुस्तीला आले आहे. प्रशासनाची अशीच उदासीन भूमिका असेल तर महापालिकेच्या उत्पन्नात भर कशी पडणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.सिमेंटरोड, पायºया व गेटचे काम शिल्लकखाऊ गल्ली येथील लोखंडी गेट मोडकळीस आले आहे. येथे नवीन गेट बसविण्याची गरज आहे. तसेच येथील पायºयांचे काम अजूनही शिल्लक आहे. खाऊ गल्लीचा रस्ता सिमेंट क्रॉंक्रीटचा केला जाणार आहे. अद्याप या कामाला सुरुवात झालेली नाही. यासह अन्य कामे अजूनही शिल्लक आहेत.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाGandhi Sagarगांधीसागर