शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांग विद्यार्थ्यांना ३ टक्के गुणांची सवलत कधी मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 10:49 IST

दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणाची समान संधी मिळावी यासाठी राज्य शासनाने त्यांना विशेष सवलती देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु यासंदर्भात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अद्यापही ठोस पाऊल उचललेले नाही.

ठळक मुद्देराज्य शासनाने दीड वर्षं अगोदर घेतला होता निर्णय

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणाची समान संधी मिळावी यासाठी राज्य शासनाने उच्च शिक्षण संस्थामध्ये त्यांना विशेष सवलती देण्याचा निर्णय घेतला होता. याअंतर्गतच अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना सत्रातील प्रत्येक परीक्षेत एकूण गुणांच्या तीन टक्के गुणांची सवलत देण्याचे ठरविण्यात आले होते. परंतु याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अद्यापही ठोस पाऊल उचललेले नाही. त्यामुळे विद्यापीठाच्या अंतर्गत शिकणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.दिव्यांग विद्यार्थ्यांचे अध्ययन, अध्यापन व मूल्यमापनाची पद्धती वेगळी असणे आवश्यक आहे. शैक्षणिक मूल्यमापनात आवश्यक सोई सवलती देण्यासंदर्भात धोरण निश्चितीसाठी शासनाने विशेष समिती नमली होती. या समितीने केलेल्या शिफारशींच्या आधारावर शासनाने ४ मार्च २०१७ रोजी निर्णय निर्गमित केले होते. यात जवळचे परीक्षा केंद्र, लेखनिकाची व्यवस्था, विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका सोडविण्यासाठी २० मिनिटांचा अतिरिक्त वेळ, आरोग्य-शारीरिक शिक्षण विषयांत सूट देणे, दिव्यांग विद्यार्थ्यांचे व्याकरणाचे गुण कापण्यात येऊ नये तसेच हजेरीमधील सूट इत्यादींचा समावेश होता. अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येक परीक्षेत एकूण गुणांच्या तीन टक्के गुणांची सवलत देण्याचा एक प्रमुख निर्णय होता. ही सवलत एकाच विषयात किंवा सर्व विषयांमध्ये विभागून देण्यासंदर्भातदेखील सूचना देण्यात आली होती. या निर्णयाची अंमलबजावणी विद्यापीठांनी तात्काळ करावी, असे निर्देश शासनाने दिले होते. नागपूर विद्यापीठाने लेखनिक व परीक्षेमध्ये २० मिनिटांचा अतिरिक्त वेळ यासंदर्भात तर निर्णय घेतला व त्यांची अंमलबजावणी मागील सत्रातील परीक्षेपासून केली. मात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना तीन टक्के गुणांची सवलत देण्यासंदर्भात अद्यापही निर्णय झालेला नाही. याची अंमलबजावणी होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्येदेखील नाराजीचा सूर आहे.

अभ्यास मंडळाला घ्यावा लागणार निर्णययासंदर्भात परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नीरज खटी यांना संपर्क केला असता शैक्षणिक मूल्यमापनातील बदल हे अभ्यास मंडळाच्या अधिकारक्षेत्रातील विषय असल्याचे स्पष्ट केले. विद्यापीठाने लेखनिक देणे किंवा परीक्षेत अतिरिक्त वेळ देणे या निर्णयांची अंमलबजावणी केली आहे. मात्र तीन टक्के गुणांची सूट देण्याच्या मुद्याला अभ्यास मंडळ व त्यानंतर विद्वत् परिषद यांची मंजुरी आवश्यक आहे. परीक्षा मंडळात यावर मोहोर लागल्यानंतर विद्यापीठ यावर पावले उचलेल, असे डॉ. खटी यांनी सांगितले. विद्यापीठात अनेक दिवस अभ्यासमंडळेच नव्हती. ती आता अस्तित्वात आली असून लवकरच पुढील प्रक्रिया विद्या विभागाकडून करण्यात येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ