शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

स्कूल बसमध्ये कधी लागणार सीसीटीव्ही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 10:56 IST

आजही ६० टक्क्यांवरील स्कूल बसमध्ये जीपीएस व सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याचे वास्तव आहे.

ठळक मुद्देपोलीस आयुक्तांच्या निर्देशाकडे दुर्लक्ष मोजक्याच शाळेच्या बसमध्ये यंत्रणा कार्यन्वित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी शालेय बसमध्ये जीपीएस, सीसीटीव्ही कॅमेरे आणि वेग नियंत्रक बसविण्याचा सूचना तत्कालीन पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम् यांनी दिल्या होत्या. त्यानुसार प्रायोगिक स्तरावर काही सीबीएसई शाळांमधील बसमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित झाली. परंतु आजही ६० टक्क्यांवरील स्कूल बसमध्ये जीपीएस व सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याचे वास्तव आहे.शालेय बसच्या खिडकीवर तारेची जाळी बसविण्यात यावी. शाळेच्या बसचा वेग ४० किमी प्रति तास करावा आणि त्यासाठी बसमध्ये वेग नियंत्रक बसविण्यात यावा. सीसीटीव्ही कॅमेरा आणि जीपीएस प्रणाली या वाहनामध्ये बंधनकारक करण्यात यावी आणि ही उपकरणे कायम चालू स्थितीत असावीत, असे ‘सीबीएसई’च्या परिपत्रकात म्हटले आहे. यालाच घेऊन गेल्या वर्षी जिल्हा स्कूल बस सुरक्षितता समिती बैठक झाली. तत्कालीन पोलीस आयुक्त डॉ. व्यंकटेशम् यांनी तातडीने ही यंत्रणा सर्व बसमध्ये लावण्याचा सूचना दिल्या. परंतु मोजक्याच बसमध्ये ही यंत्रणा लागली. याकडे वाहतूक पोलिसांसह, आरटीओ कार्यालय व शिक्षण विभागाचे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे.

शालेय परिवहन समिती कागदापुरतीचविद्यार्थ्यांच्या वाहतुकीला घेऊन शासनाने प्रत्येक शाळांमध्ये शालेय परिवहन समिती तयार करणे अनिवार्य केले. मुलांची सुरक्षित ने-आण, परिवहन शुल्क, बस थांबे निश्चित करणे आदींची जबाबदारी या समितीकडे सोपविली. सध्या जिल्ह्यातील ४०६० शाळांमधून ३८५५ शाळांमध्ये ही समिती स्थापन झाल्याचे सांगण्यात येते. मात्र समिती कागदापुरतीच मर्यादित असल्याने, पालकांनी कोणाच्या विश्वासावर मुले सोपवायची, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे

क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईशालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी बसविण्यात येतात. आयुर्मान संपलेल्या वाहनामार्फतही वाहतूक सुरू आहे. यामुळे अशा वाहनांचे अपघात होऊन विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात येतो. यापूर्वी अनेक घटनांमधून ही बाब पुढे आली आहे. दोन दिवसापूर्वी अशा स्कूल वाहनांवर कारवाई झाली, परंतु त्यानंतरही यात सुधारणा झाली नसल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Schoolशाळा