शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात सात हजार पथदिवे कधी लागणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 00:45 IST

महापालिकेच्या विद्युत विभागाने शहराच्या विविध भागात सुमारे सात हजार खांब उभारले आहेत. परंतु मागील आठ महिन्यापासून यासाठी निधी उपलब्ध होत नसल्याने या खांबावर अद्याप एलईडी दिवे बसविण्यात आलेले नाही. यामुळे रात्रीच्या सुमारास या परिसरातील नागरिकांना अंधाराचा त्रास सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्दे निधीअभावी काम रखडले : नागरिक रात्रीच्या अंधारामुळे त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: महापालिकेच्या विद्युत विभागाने शहराच्या विविध भागात सुमारे सात हजार खांब उभारले आहेत. परंतु मागील आठ महिन्यापासून यासाठी निधी उपलब्ध होत नसल्याने या खांबावर अद्याप एलईडी दिवे बसविण्यात आलेले नाही. यामुळे रात्रीच्या सुमारास या परिसरातील नागरिकांना अंधाराचा त्रास सहन करावा लागत आहे.पथदिवे बसविण्यासाठी १२ कोटींच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. तत्कालीन आयुक्त अभिजित बांगर यांनीही या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. आवश्यक सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरही वित्त विभागाने निधी उपलब्ध न केल्याने पथदिवे बसविण्याचे काम रखडले आहे.तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनी पथदिव्याच्या फाईलला मंजुरी दिली होती. तत्कालीन आयुक्तांनी सहमती दर्शविल्याने ही फाईल मंजूर करून स्थायी समितीने वित्त विभागाकडे पाठविली होती. परंतु तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मनपाची आर्थिक स्थिती विचारात घेता विकास कामांना ब्रेक लावले होते. यात पथदिव्यांची फाईल मागील काही महिन्यापासून वित्त विभागाकडे प्रलंबित होती. महापौरांनी सभागृहात प्रलंबित विकासकामांना निधी उपलब्ध करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरही पथदिव्यांचा प्रश्न मार्गी लागला नाही.अधिकाऱ्यांना नोटीस बजावली पण प्रश्न कायममहापालिका कलम ७२ (सी) अंतर्गत निर्धारित कालावधीत फाईलवर निर्णय न घेतल्या प्रकरणी स्थायी समितीने वित्त अधिकारी मोना ठाकूर यांना नोटीस बजावून या संदर्भात स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश स्थायी समितीचे अध्यक्ष पिंटू झलके यांनी दिले होते. परंतु त्यानंतरही फाईल मार्गी लागली नाही.प्रशासन गंभीर नाहीमागील आठ महिन्यापासून पथदिव्यांची फाईल प्रलंबित आहे. खांब उभे आहेत परंतु त्यावर पथदिवे नसल्याने नागरिकांना रात्रीच्या सुमारास त्रास सहन करावा लागतो. यासंदर्भात विद्युत विभाग व वित्त विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. परंतु प्रशासन गंभीर नसल्याचा आरोप प्रदीप पोहाणे यांनी केला आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका