शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात ३१ हजार एलईडी कधी लागणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 20:55 IST

३१ मे २०१८ पर्यंत शहरातील सर्व मार्गावर एलईडी लावण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानंतर ३१ डिसेंबर व नंतर ३० सप्टेंबर २०१९ पर्यत मुदतवाढ देण्यात आली. वेळोवेळी मुदत वाढवून दिल्यानंतरही ३१ हजार एलईडी लागलेले नाहीत.

ठळक मुद्देनिर्धारित कालावधीत एलईडी लावण्यात अपयश : कंत्राटदारांना पाठिशी घालण्याचा प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या नागपूर शहरातील पथदिव्यांच्या जागी एलईडी लावण्याचे काम मागील दोन वर्षापूर्वी सुरू करण्यात आले. निर्धारित कालावधीत एलईडी लावण्यात अपयश आल्याने कंत्राटदारांना वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली. ३१ मे २०१८ पर्यंत शहरातील सर्व मार्गावर एलईडी लावण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानंतर ३१ डिसेंबर व नंतर ३० सप्टेंबर २०१९ पर्यत मुदतवाढ देण्यात आली. वेळोवेळी मुदत वाढवून दिल्यानंतरही ३१ हजार एलईडी लागलेले नाहीत.दिवसेंदिवस वाढणारा वीज बिलाचा बोजा कमी व्हावा, यासाठी सोडियम व्हेपर दिव्यांच्या जागी १ लाख ४३ हजार एलईडी लावण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. यासाठी नागपूर स्मार्ट सिटी अ‍ॅन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉपोर्रेशन लिमिटेडची मदत घेण्यात आल्याचा दावा करण्यात आला. परंतु वारंवार मुदतवाढ दिल्यानंतरही एलईडी लावण्याचे काम अर्धवट आहे.पथदिव्यांच्या वीज बिलावर महापालिका वर्षाला ५८ कोटी खर्च करते, म्हणजेच दर महिन्याला ४.३५ कोटी खर्च होतात, तर दर महिन्याला ६१ हजार युनिट वीजवापर होतो. यात बचत व्हावी, यासाठी दोन वर्षापूर्वी स्थायी समितीत एलईडी लावण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानंतर मे २०१९ पर्यंत शहरातील सर्व जागी एलईडी लावण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती. मात्र अजूनही हा प्रकल्प पूर्ण झालेला नाही. वीज बिलावर वर्षाला १५ कोटींची बचत होईल. तसेच देखभाल व दुरुस्तीवरील खर्च विचारात घेता एकूण ३८ कोटींची बचत होणार असल्याचा प्रशासनाचा दावा आहे. पथदिव्यांवर ६१ हजार युनिट वीज खर्च होत होती. आता ३२ हजार युनिट वीज लागत असल्याचा दावा केला आहे. एलईडी दिव्यासंदर्भात वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी महापालिकेच्या विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता ए.एस.मानकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी माहिती उपलब्ध नसून गोळा करू असे सांगितले.विलंबाला जबाबदार कोण?पथदिव्यांच्या जागी एलईडी लावण्यात आल्याने पथदिव्यावरील वीज खर्चात दर महिन्याला २.०७ कोटींची बचत झाल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. आधी पथदिव्यांचा वीज खर्च दर महिन्याला ४.३५ कोटी होता. आता तो २.२८ कोटींवर आला आहे. संपूर्ण शहरात एलईडी बसविण्यात आल्यानंतर महापालिकेची वर्षाला ३८ कोटींची बचत होणार असल्याचा दावा विद्युत विभागाने केला आहे. असे असूनही प्रकल्पाला विलंब झाल्याने होणाऱ्या आर्थिक नुकसानाला जबाबदार कोण? संबंधित कंत्राटदारांकडून ही रक्कम वसूल करणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका