शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

१०० टक्के विल्हेवाट अन् संकलन कधी होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:06 IST

५० टक्के कचऱ्यावर प्रक्रिया : जीपीएस यंत्रणा असूनही कचऱ्याच्या तक्रारी लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर शहरात दररोज १ ...

५० टक्के कचऱ्यावर प्रक्रिया : जीपीएस यंत्रणा असूनही कचऱ्याच्या तक्रारी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर शहरात दररोज १ हजार मेट्रिक टन कचरा संकलित केला जातो. हा कचरा २२ हेक्टर जमिनीवर पसरलेल्या भांडेवाडी डम्पिंग यार्ड येथे साठविला जातो. कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया (रिसायकलिंग) करण्याची सुविधा नसल्याने दररोज ५०० मेट्रिक टन डम्प करावा लागतो. दुसरीकडे शहरालगतच्या भागात कचरा संकलन करणाऱ्या गाड्या दररोज पोहचत नसल्याच्या तक्रारी आहेत. शहरातील कचऱ्याची १०० टक्के विल्हेवाट व कचरा संकलनाची समस्या कधी सुटणार, असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे.

भांडेवाडी डम्पिंग यार्ड येथे १० लाख मेट्रिक टन कचऱ्यापैकी वर्षभरात २ लाख मेट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली. शहरात दररोज निघाणाऱ्या १ हजारपैकी २०० मेट्रिक टन कचऱ्यावर हंजर कंपनीकडून प्रक्रिया करून खत व आरडीएफ तयार केले जाते. २०० मे. टन ओल्या कचऱ्यावर रिसायकलिंग करून त्यापासून खत निर्माण केले जाते. तर ५०० मे. टन कचरा प्रक्रिया न करता डम्प करावा लागतो.

....

नियंत्रणासाठी जीपीएस यंत्रणा

शहारातील कचरा संकलनाची जबाबदारी एजी एन्व्हायरो व बीव्हीजी या दोन कंपन्यांकडे देण्यात आली आहे. डोअर टू डोअर संकलनासाठी कंपन्यांची ३५० वाहने असून कचरा वाहून नेण्यासाठी ५० मोठी वाहने आहेत. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जीपीएस यंत्रणेचा वापर केला जातो. परंतु त्यानतंरही काही भागात कचरागाडी नियमित येत नसल्याच्या तक्रारी आहेत.

..

नियंत्रणाची जबाबदारी झोन कार्यालयांची

शहरातील कचरा संकलन व वाहून नेण्याची प्रक्रिया योग्यप्रकारे होते की नाही, यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी महापालिकेच्या त्या त्या भागात झोन कार्यालयांची आहे. परंतु काही झोनमध्ये कचरा संकलन योग्यप्रकारे होत नसल्याच्या तक्रारी आहेत.

...

१०० टक्के प्रक्रियेचा प्रयत्न

कचरा संकलन व कचरा प्रक्रिया सक्षम करण्याचा प्रयत्न आहे. १०० टक्के कचऱ्यावर प्रक्रिया व्हावी, यासाठी नियोजन सुरू आहे. तसेच शहराच्या सर्व भागातील कचरा दररोज उचलला जावा, अशा सूचना कंपन्यांना व झोन कार्यालयांना दिल्या आहेत.

डॉ. प्रदीप दासरवार, उपायुक्त (घनकचरा) मनपा

....

-शहरात दररोज निघणारा कचरा -१ हजार मेट्रिक टन

-डोअर टू डोअर जाणारी वाहने-३५०

-कचरा वाहून नेणारी वाहने -५०

- ५०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया

-५०० मेट्रिक टन कचरा प्रक्रिया न करता साठविला जातो.